Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Congress on Ashish Shelar : ‘राहुल गांधींवर बोलण्याआधी SIR समजून घ्या! आशिष शेलारांना SIR चा कारभारच माहिती नाही?’ काँग्रेसची टीका

Congress on Ashish Shelar : महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावरून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे. मंत्री आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याआधी निवडणूक आयोगाच्या कामकाजाची माहिती घ्यावी, असा टोला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी लगावला.

  • By विवेक
Updated On: Nov 17, 2026 | 08:48 PM
Ashish shelar

Ashish shelar

Follow Us
Follow Us:
  • ‘आशिष शेलारांनी आधी माहिती घ्यावी!’ – ॲड. संदेश कोंडविलकर
  • SIR वरून काँग्रेसचा भाजपला सवाल
  • 2 कोटी मतदारांच्या नावांचा मुद्दा पुन्हा चर्चेत
 

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय वाद पुन्हा पेटला आहे. निवडणूक आयोगाच्या कामकाजावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असताना भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. यावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी शेलारांना प्रत्युत्तर देत आधी माहिती घ्या आणि मगच बोला, असा टोला लगावला आहे. (Congress on Ashish Shelar)

निवडणूक आयोगाची वकिली का करता? काँग्रेसचा सवाल

राहुल गांधी यांनी देशभरात ‘वोट बचाव, देश बचाव’ आंदोलनाच्या माध्यमातून कथित वोटचोरी आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयातही कायदेशीर लढाई सुरू असल्याचे कोंडविलकर यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोग किंवा निवडणूक आयुक्तांना प्रश्न विचारले की भाजप नेत्यांना एवढा राग का येतो? असा सवाल करत त्यांनी आशिष शेलार यांच्यावर टीका केली. राहुल गांधींवर बोलण्याआधी शेलार यांनी महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असेही ते म्हणाले.

NCP on Rohit Pawar : ‘मफलर मॅन’वरून दोन्ही राष्ट्रवादीत मतभेद? फडणवीसांना बदनाम करू नका, अजित पवार गटाची रोहित पवारांवर टीका

महाराष्ट्रात 2 कोटींहून अधिक मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत

कोंडविलकर यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, SIR पूर्वी महाराष्ट्रात 9 कोटी 78 लाखांहून अधिक मतदार होते. मात्र, 31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7 कोटी 71 लाखांहून अधिक मतदारांचा समावेश झाला. उर्वरित 2 कोटी 6 लाखांहून अधिक मतदारांची नावे प्रारूप यादीत नव्हती.

याशिवाय सुमारे 1 कोटी 22 लाख मतदारांना कागदपत्रांतील तफावत किंवा जुन्या मतदार यादीशी नोंद जुळत नसल्याने नोटिसा देण्यात आल्या होत्या. या आकड्यांवरून काँग्रेसने निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बोगस अर्जांवरही काँग्रेसचे प्रश्न

काही विधानसभा मतदारसंघांमध्ये नाव वगळण्यासाठी बोगस अर्ज दाखल झाल्याच्या तक्रारी काँग्रेसच्या बूथस्तरीय प्रतिनिधींनी केल्याचा दावा कोंडविलकर यांनी केला. अशा प्रकरणांमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 6 नोव्हेंबरच्या परिपत्रकाद्वारे प्रारूप यादीतून वगळल्या गेलेल्या काही मतदारांना पुन्हा संधी देण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

SIR मधील प्रश्न अजूनही अधांतरी!

निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी आयोगाची बाजू घेण्याऐवजी वस्तुस्थिती समजून घ्यावी, अशी भूमिका कोंडविलकर यांनी मांडली.

महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र मतदाराला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे. मतदार यादीतील त्रुटी, हरकती आणि पुनर्नोंदणीच्या प्रक्रियेबाबत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या आरोपांवर भाजप आणि निवडणूक आयोगाकडून काय उत्तर येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

💡

Frequently Asked Questions

  • Que: संदेश कोंडविलकर यांनी आशिष शेलारांवर टीका का केली?

    Ans: निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेवर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाष्य करण्याआधी आशिष शेलार यांनी संपूर्ण माहिती घ्यावी, असे कोंडविलकर म्हणाले. राहुल गांधी यांच्यावरील टीकेवरूनही त्यांनी शेलारांना लक्ष्य केले.

  • Que: महाराष्ट्रात SIR दरम्यान किती मतदारांची नावे प्रारूप यादीत नव्हती?

    Ans: निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, SIR पूर्वी महाराष्ट्रात 9,78,54,049 मतदार होते. त्यापैकी 7,71,65,562 मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झाली, तर 2,06,88,487 मतदारांची नावे प्रारूप यादीत नव्हती. मात्र, याचा अर्थ या सर्व मतदारांची नावे अंतिम यादीतून कायमची वगळली गेली असा होत नाही.

  • Que: महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेची अंतिम मतदार यादी कधी प्रसिद्ध होणार आहे?

    Ans: निवडणूक आयोगाच्या 29 ऑक्टोबर 2026 च्या सुधारित वेळापत्रकानुसार, दावे आणि हरकतींची मुदत 13 नोव्हेंबरपर्यंत होती. त्यावरील निर्णय 25 नोव्हेंबरपर्यंत घेण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 30 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

Web Title: Congress on ashish shelar election commission sir controversy sandesh kondvilkar congress vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:48 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • BJP
  • Congress
  • Election Commission
  • SIR

संबंधित बातम्या

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
1

Nashik News : भुसावळच्या मतदार यादीत मोठा घोळ? एकाच दिवशी 14 हजारांहून अधिक मतदारांविरोधात हरकती, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन
2

एफसी रोडवरील अतिक्रमणावरून भाजप नगरसेवक आक्रमक; महापालिका सभागृहातच आंदोलन

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख
3

Rahul Gandhi Girlfriend News: केंब्रिजमध्ये भेटलेली प्रेयसी..! राहुल गांधीनी पहिल्यांदाच केला गर्लफ्रेंडचा उल्लेख

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले
4

Bharat Summit: ‘भारताला लोकशाही शिकवू नका!’ काँग्रेसच्या कार्यक्रमातील ‘मत चोर’घोषणेवरून इटलीच्या नेत्याने सहकाऱ्याला सुनावले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.