
बिहारमध्ये जोरदार राडा! DCM सिन्हांच्या रॅलीमध्ये Firing; समर्थकांवर कारवाई होणार?
बिहारचे उपमुख्यमंत्री सिन्हा यांच्या रॅलीमध्ये गोळीबार
विजयी रॅलीमध्ये समर्थकांकडून हवेत गोळीबार
विधानसभा निवडणुकीत एनडीएला मिळाले अभूतपूर्व यश
बिहारमध्ये नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. एनडीएला प्रचंड बहुमत प्राप्त झाले आहे. नितीश कुमार 10 व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आहेत. तर विजय सिन्हा हे भाजपकडून उपमुख्यमंत्री झाले आहेत. विजय सिन्हा सलग 5 वेळा बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी आपल्या मतदारतसंघात विजयी रॅली काढली होती. त्यामध्ये त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी आपल्या मतदारसंघात विजयी रॅली काढली होती. बहरिया मतदारसंघात विजय सिंह हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विजयी रॅलीमध्ये त्यांनी नागरिकांना संबोधित केले. दरम्यान त्यांच्या रॅलीला प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायदा पायदळी उडवल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची रॅली सुरू असताना हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या तेही उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोळीबार झाल्याने चर्चा सुरू झाली आहे. बिहारमध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अचानक हवेत गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.
मोठी बातमी! बिहारचे DCM विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला; नक्की घडले काय?
काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केलेली टीका निरर्थक आहे. इंदिरा गांधी, राजीवजी गांधी यांचाही निवडणुकीत पराभव झाला पण त्यानंतर काँग्रेस पक्ष नव्या जोमाने व ताकदीने उभा राहिला. काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि जनतेचा काँग्रेसवर विश्वास आहे, त्यामुळे काँग्रेस संपेल,
मुंबई काँग्रेसचे एक दिवसीय शिबीर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, सहप्रभारी यु. बी. व्यंकटेश, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, ज्योती गायकवाड यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
बिहारच्या निकालामुळे खचून जाऊ नका, नकारात्मकता सोडा अन्…; काँग्रेसच्या बड्या नेत्याचे आवाहन
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बिहार विधानसभेचे निकाल उलटे लागले असते तर आजचा उत्साह अधिक वाढला असता पण पराभव झाला म्हणून खचून जावू नका. काँग्रेस कार्यकर्त्याने पुन्हा नव्या जोमाने व ताकदीने कामाला लागले पाहिजे. रडायचे नाही तर लढायचे हा बाणा अंगी बाळगला पाहिजे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजयी झेंडा फडवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, असे आवाहन सपकाळ यांनी केले.