DCM विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला (फोटो- ani)
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला
बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
14 तारखेला जाहीर होणार निकाल
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. आज 121 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना लखीसराय यांना विरोध करण्यात आला आला. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला झाल्यावर सिन्हा यांनी राजदवर आरोप केला आहे.
ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी हा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. याब हल्ल्यासाठी त्यांनी राजदला जबाबदार धरले आहे. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर लखीसपुर येथे हल्ला करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि लखीसराय मतदारसंघातील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या गाडीला राजद समर्थकांनी घेरले. त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. तसेच मुर्दाबाद आशा घोषणा देण्यात आल्या.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री विजय सिन्हा?
हे राजदचे गुंड आहेत. एनडीएची सत्ता येणार आहे. यांचे गुंड मला गावात जाऊन देत नाहीत. विजय सिन्हा जिंकणार आहेत. त्यांनी माझ्या पोलिंग एजंटला हाकलून लावले. त्याला मतदान करू दिले नाही.
मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार चक्क म्हशीवर आला
बिहारच्या वैशाली जिल्ह्यात देखील आज मतदान सुरू आहे. या जिल्ह्यातील एका उमेदवाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील भगवानपुर मतदारसंघातील आरजेडी नेता चक्क म्हशीवर बसून मतदानासाठी आल्याचे दिसून आले. आरजेडी पक्षाचे उमेदवार केदार प्रसाद यादव हे चक्क म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral
काय म्हणाले उमेदवार केदार प्रसाद यादव?
पाच वर्षांनी लोकशाहीचा उत्सव आला आहे. आज सर्वांनी मतदान केले पाहिजे. शेतकरी असल्याने मी आज म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. मी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करतो.
भारत एक कृषीप्रधान देश आहे. आम्ही शेतकरी आहोत. यासाठी मी म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. केदार प्रसाद यादव यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात
पहिल्या टप्प्यात एकूण ३७.५१३ दशलक्ष मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १९.८३५ दशलक्ष, ३२५ पुरुष, १७.६७ दशलक्ष, २१९ महिला आणि ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मतदान केंद्रांवर अपंग आणि वृद्ध मतदारांसाठी विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत. ३२२०७७ अपंग मतदार आणि ५३१४२३ ज्येष्ठ नागरिक मतदार (८० वर्षांवरील ५२४6८७ मतदार आणि १०० वर्षांवरील ६७३६ मतदारांसह) आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
Ans: हे राजदचे गुंड आहेत. एनडीएची सत्ता येणार आहे. यांचे गुंड मला गावात जाऊन देत नाहीत. विजय सिन्हा जिंकणार आहेत. त्यांनी माझ्या पोलिंग एजंटला हाकलून लावले. त्याला मतदान करू दिले नाही.
Ans: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे.






