Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DY Chandrachud : पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त शिक्षा…”

कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मात्र, कायद्याशिवायही समाजावर देखील मोठी जबाबदारी आहे. असं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेवर व्यक्त केलं.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 27, 2025 | 09:49 PM
पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त शिक्षा…”

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “फक्त शिक्षा…”

Follow Us
Close
Follow Us:

“निर्भया बलात्कार प्रकरणानंतर आपल्याकडे विशेषतः कायद्यात अनेक बदल करण्यात आले. मात्र केवळ कायद्याच्या माध्यमातून आणि शिक्षा करून आपण अशा घटना कमी करू शकत नाही. कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मात्र, कायद्याशिवायही समाजावर देखील मोठी जबाबदारी आहे. महिला नोकरी, शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊन काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक स्तरावर महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली पाहिजे, जेणेकरून महिला जिते जातील तिथे त्यांना सुरक्षित वाटेल.”, असं मत सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेवर व्यक्त केलं.

ते पुढे म्हणाले की, “असं उदाहरण समोर आल्यानंतर त्याच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई करणे , योग्य पद्धतीने तपास होणे, लवकरात लवकर सुनावणी होऊन शिक्षा होणे हे खूप गरजेचे आहे. न्यायव्यवस्था आणि पोलिसांची यामध्ये मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक स्तरावर आपण यावर लक्ष देऊन विचार केला पाहिजे, जेणेकरून आपण एक नवीन समाजाकडे पुढे जाऊ शकू, जेथे आपल्या समाजातील अर्धा हिस्सा असलेल्या महिला सुरक्षितपणे नोकरी, शिक्षण अशी प्रत्येक गोष्ट करू शकतील,” असंही त्यांनी म्हटलं आहे.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी १३ पथके स्थापन करण्यात आली आहेत. इतकेच नाही तर पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्यासाठी १ लाख रुपायांचे बक्षीस देखील जाहीर केले आहे. या धक्कादायक प्रकारानंतर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यादरम्यान भारताचे माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी देखील या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी सकाळी उजेडात आली. या प्रकारानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार होता, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल असून तो सध्या जामिनावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा शोध घेण्याकरता पुणे पोलिसांनी १ लाखांचे बक्षिसही जाहीर केलेअसून त्याच्या कुटुंबियांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात स्वारगेट स्थानकात तैनात असलेल्या २३ सुरक्षा रक्षकांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Web Title: Former cji dy chandrachud reaction on pune bus physical assault case marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 09:30 PM

Topics:  

  • CJI Chandrachud
  • Pune Crime
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक
1

Pimpri Chinchwad crime news: पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर, पाच जण वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…
2

Pune crime news : पुण्यात पुन्हा वैष्णवी हगवणे प्रकरण; उच्चशिक्षित तरुणीने संपवलं जीवन, नवऱ्याला हवी होती सोन्याची अंगठी, फ्लॅट…

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
3

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
4

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.