दिवाळीपूर्वी घरात मृत्यूचं तांडव, सजावट करणं पडलं महागात, कुटुंबातील चार जणांचा मृत्यू!

उदयपूरमध्ये दिवाळीसाठी घरात सजावट करत असताना विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने एका दिड वर्ष चिमुकलीच जीव वाचला आहे.

    उदयपूर : दोन दिवसावर दिवाळी (Diwali 2023) आली आहे. त्यामुळे घरात साफसफाई आणि सजावटीचं काम सध्या सगळे करत आहेत. यामध्ये कुंटुंबातील सर्व सदस्य घरकामात हातभार लावताना दिसतात. मात्र, राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात अख्ख्या कुटुंबाला मिळून साफसाफई करणं जीवघेणं ठरलं आहे. येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा घरात मृत्यू झाला. यामध्ये वृद्ध पती-पत्नीसह मुलगा आणि सून यांना समावेश आहे. सुदैवाने दिड वर्षाची मुलगी घराबाहेर असल्यानं बचावला आहे.

    नेमकं काय झाल

    मिळालेल्या माहितीनुसार, अचानक शॉर्टसर्किट झाल्याने घरभर विद्युत प्रवाह वाहू लागल्याने ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. दिवाळी निमित्त संपूर्ण कुटुंब दिवाळीच्या सणासाठी घर सजवण्यात व्यस्त होते. यावेळी सर्वप्रथम घरातील ज्येष्ठ उन्कर यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांना त्रास सुरू झाला. हे पाहून त्यांची पत्नी भामरी, मुलगा देवीलाल आणि सून मंगी यांनीही वृध्दाला वाचवण्यासाठी धाव घेतली मात्र तिघांनाही विजेचा धक्का बसले. एकापाठोपाठ चौघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, सुदैवाने देवीलाल यांची दीड वर्षाची मुलगी दरवाजापासून दूर उभी होती, त्यामुळे तिला विजेचा धक्का लागला नाही. सध्या चारही मृतदेहांवर शुक्रवारी एकत्रितपणे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत मृत्युमुखी पडलेले चारही लोक चांगलेच भाजले. या परिसरात मृतांचे अनेक नातेवाईक राहत असले तरी, आता सर्वात मोठे संकट देवीलाल यांच्या दीड वर्षाच्या मुलीवर उभे राहिले आहे कारण तिचे चारही आई-वडील आणि आजी-आजोबा एकत्र मरण पावले आहेत.