(फोटो सौजन्य: Pinterest)
बजेटमध्ये ट्रिप होईल पूर्ण! फक्त 10,000 रुपयांत फिरता येतात भारतातील ही ठिकाणे
१००० वर्षे जुनी अद्भुत रचना
हे ठिकाण आभनेरी गावात असलेली चांद बाओरी आहे. ही विहिर निकुंभ घराण्याचे राजे चंद ८व्या आणि ९व्या शतकात बांधली होती. सुमारे ३० मीटर खोल असलेली ही पायऱ्यांची विहिर १३ मजली असून त्यात अचूक समरुपतेने बांधलेल्या अंदाजे ३,५०० पायऱ्या आहेत. ही रचना पहिल्याच नजरेत लक्षवेधी आहे. तिचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे तिची रचना. वरुन पाहिल्यास, पायऱ्यांशी रचना एका उलट्या पिरॅमिडसारखी दिसते ज्यामुळे एक दृष्टिभ्रम निर्माण होतो जो पर्यटकांना मोहित करतो.
केवळ सौंदर्यच नव्हे, तर उपयुक्तताही
चांद बाओरी ही विहिर फक्त दिसायलाच सुंदर नाही तर एक अत्यंत उपयुक्त अशी वास्तू देखील आहे. राजस्थानच्या उष्ण आणि कोरड्या हवामानात हंगामया प्रदेशात पाण्याची टंचाई ही नेहमीच एक मोठी समस्या राहिली आहे. अशात पायऱ्यांची ही विहिर पावसाचे पाणी साठवण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. येथे पाणी साठवून दिर्घ काळासाठी वापरले जात असे. शिवाय, तिच्या खोलीमुळे आणि रचनेमुळे सभोवलतालचे तापमान थंड ठेवण्यास मदत होते. यामुळे हे ठिकाण फक्त एक जलाशय नसून हवामानाचे संतुलन राखण्यासाठी एक प्रमुख उपयुक्त असे केंद्र बनले आहे.
चित्रपटांचे झाले आहे शूटिंग
चांद बाओरीचे साैंदर्य केवळ पर्यटकांपुरते मर्यादित नाही, तर त्याने चित्रपटसृष्टिलाही आपलं वेड लावलं आहे. हे ठिकाण ‘पहेली’ आणि ‘भूल भुलैया’ या बाॅलिवूड चित्रपटांमध्ये दिसून आलं आहे. त्याचबरोबर ‘द डार्क नाईट राइझेस’ आणि ‘द फॉल’ या हॉलिवूड चित्रपटांचीही इथे शूटिंग झाली आहे.
देवाला दत्तक घेण्यासाठीची अनोखी ओढ! भगवंताचे आई-वडील होण्यासाठी इथे भक्त लावतात लाखोंची बोली
कसं जायचं इथे?
जयपूरपासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या या पायऱ्यांच्या विहिरीला तुम्ही सहज भेट देऊ शकता. याच्या जवळच हर्षत माता मंदिर आहे जिथे भाविक प्रार्थना करण्यापूर्वी चांद बाओरीला भेट देतात. हे केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही तर त्या काळातील विचार आणि अभियांत्रिकीचे एक भव्य उदाहरण आहे. हा एक लपलेला खजिना आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.






