
गोवा अग्निकांडानंतर सरकार ॲक्शन मोडवर! (Photo Credit - X)
SDMA ने स्पष्ट केले आहे की, सर्व आस्थापनांना अग्निसुरक्षा, इलेक्ट्रिकल सुरक्षा, आपत्कालीन तयारी आणि संरचनात्मक सुरक्षा मानकांचे कठोरपणे पालन करणे अनिवार्य असेल.
#WATCH | Fire at a restaurant in North Goa’s Arpora, claiming 25 lives | Goa CM Pramod Sawant says, “… The committee shall be constituted under the chairmanship of the Secretary of Revenue for conducting the audit of such clubs, business establishments, etc., which are… https://t.co/1Og3oQb0AA pic.twitter.com/bEdhMPitMZ — ANI (@ANI) December 7, 2025
नाईट क्लब्ससाठी SDMA चे प्रमुख आणि कठोर निर्देश
कठोर कारवाईची चेतावणी
सर्व आस्थापनांना ७ दिवसांच्या आत आपले अंतर्गत सुरक्षा ऑडिट पूर्ण करून, त्याचा अहवाल जिल्हा प्रशासन, अग्निशमन सेवा किंवा SDMA च्या पथकांच्या तपासणीसाठी तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. SDMA ने स्पष्ट चेतावणी दिली आहे की, या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल, ज्यात आस्थापना बंद करणे, परवाना निलंबित/रद्द करणे आणि DM Act, 2005 च्या कलम ५१(b) व इतर संबंधित कायद्यांनुसार अभियोजन समाविष्ट असेल. हे निर्देश तात्काळ प्रभावाने लागू झाले आहेत.
नाईट क्लबच्या व्यवस्थापकाला अटक
गोवा येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (Fire and Emergency Services) संचालक, नितीन व्ही. रायकर यांनी स्पष्ट केले की, क्लबकडे आग प्रतिबंधक उपायांसाठी आवश्यक असलेले NOC नव्हते. अग्निशमन विभागाने या क्लबला काम करण्यासाठी कधीही ‘फायर NOC’ जारी केले नव्हते. दुर्घटना घडल्यानंतर नाईट क्लबच्या व्यवस्थापकाला (Manager) अटक करण्यात आली आहे.