अहमदाबाद अपघातामध्ये भूमी चौहान सुखरूप (फोटो- सोशल मिडिया)
अहमदाबाद: काल गुजरातच्या अहमदाबाद येथे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. या भीषण दुर्घटनेत २४२ प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी बचावला आहे. तर यामध्ये गुजरातची एक तरुणी देखील सुखरूप राहिली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.काल अहमदाबादवरुन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले. त्यामध्ये गुजरातची भूमी चौहान नावाची एक तरुणी देखील बचावली आहे. एअरपोर्टवर पोचायला उशीर झाल्याने ती या दुर्घटनेतून वाचली आहे.
भूमी चौहान या अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या फ्लाईटमधून प्रवास करणार होत्या. मात्र त्यांना एअरपोर्टवर 10 मिनिटे उशीर झाला आणि त्या या मोठ्या घटनेतून सुखरूप वाचल्या आहेत. भूमी चौहान या एअर इंडियाच्या विमानातून अहमदाबादवरुण लंडनला जाणार होत्या. मात्र ती विमानाच्या वेळेत पोहोचू शकली नाही.
याबाबत भूमी चौहान यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, मला वाटेत ट्रॅफिक लागल्याने विमानतळावर पोचण्यास उशीर झाला. त्यामुळे मला विमानात चढू देण्यात आले नाही.” मात्र आता जीव वाचल्याने तिने देवाचे आभारच मानले आहेत. मी सुरक्षित आहे मात्र घडलेला अपघात अत्यंत हृदयद्रावक आहे.
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणींचे अहमदाबाद विमान दुर्घटनेत निधन
अहमदाबादच्या मेघानीनगर येथे लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर केवळ काही मिनिटांतच हे विमान रहिवाशी भागात कोसळले. यामध्ये 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यातल 242 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अद्याप खरा आकडा समोर आला नाही. मात्र या दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे निधन झाले आहे.
अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या विमानात 242 प्रवासी होते. तर याच विमानातून गुजरत भाजपचे नेते. गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि चांदीगड, पंजाबचे प्रभारी विजय रूपाणी देखील प्रवास करत होते. दरम्यान गुजरात भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी विजय रूपाणी यांच्या मृत्यूबद्दल सांगितले आहे.
विजय रूपाणी का चालले होते लंडनला?
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हे अहमदाबादवरून लंडनला चालले होते. विजय रूपाणी यांची पत्नी लंडनला असल्याचे समजते आहे. विजय रूपाणी हे आपल्या पत्नीला लंडनवरून आणण्यासाठी चालले होते. विजय रूपाणी यांची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये असल्याचे समजते आहे. पत्नीला आणण्यासाठी रूपाणी चालले होते. ते ज्या विमानाने लंडनला चालले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विजय रूपाणी हे सीट नंबर ‘2 डी’ वर बसले होते असे सांगितले जात आहे. मात्र याबाबत खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.