नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मात्र गेले एक ते दोन दिवस पावसाने थोडीशी उसंत घेतली होती. मात्र आज मुसळधार पावसाने राजधानी दिल्लीला झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आज संध्याकाळच्या सुमारास दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे. मुसळधार पावसाने संध्याकाळी ऑफिसवरून घरी जाणाऱ्या लोकांना थोडासा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी पाणी साठले आहे. सखल भागात साचलयाने वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रचंड पावसाने दिल्लीकरांचे हाल झाले. संध्याकाळच्या सुमारास झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गुरूग्राम राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतुकीला मोठा फकता बसला. राजधानी दिल्लीत आज कमी वेळात मोठा पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले.
राजधानी दिल्लीने पावसाचा रेकॉर्डही मोडला
राजधानी दिल्लीत देखील यंदाच्या वर्षी जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जनजीवन विस्कळीत झाले. उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांत तर ढगफुटी झाल्याचे पाहायला मिळाले. तर राजधानी दिल्लीत देखील सर्वाधिक पाऊस झाला आहे. दिल्लीत पावसाने कोणता रेकॉर्ड केला आहे ते, जाणून घेऊयात.
India Rain News: राजधानी दिल्लीने पावसाचा रेकॉर्डही मोडला, ऑगस्ट महिन्यात पावसाने झोडपले
राजधानी दिल्लीत यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिल्लीत ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दिल्लीत वर्षभरात जितका पाऊस होतो, तेवढा पाऊस दिल्लीत केवळ ऑगस्ट महिन्यात झाला आहे. दिल्लीत गेल्या 25 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीही पडला नव्हता. तेवढा पाऊस दिल्लीत झाला आहे. मात्र तरीही नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही.
17 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
भारतीय हवामान खात्याची माहीतीनुसार, 1 जून ते 18 ऑगस्टपर्यंत दिल्लीत सरासरी आद्रता ही 76.5 टक्के इतकी होती. 2008 नंतर ही दुसरी वेळ आहे. जेव्हा दिल्लीत सर्वाधिक आद्रता आहे. साधारणतः पावसाळ्यात दिल्ली सरासरी आद्रता ही 67.2 टक्के राहते. जून आणि जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्याने यावेळेस दिल्लीत आद्रता जास्त होती. ऑगस्टच्या सुरुवातीला दिवसांमध्ये आद्रतेची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर आद्रता वाढल्याने मागचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले.