दिल्लीत पावसाने मोडला रेकॉर्ड (फोटो- ani)
गेले काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्वतीय राज्य, पूर्वेकडील राज्ये, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. राजधानी दिल्लीत देखील यंदाच्या वर्षी जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. जनजीवन विस्कळीत झाले. उत्तराखंड व हिमाचल प्रदेश या राज्यांत तर ढगफुटी झाल्याचे पाहायला मिळाले. तर राजधानी दिल्लीत देखील सर्वाधिक पाऊस झाला आहे. दिल्लीत पावसाने कोणता रेकॉर्ड केला आहे ते, जाणून घेऊयात.
राजधानी दिल्लीत यावर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दिल्लीत ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. दिल्लीत वर्षभरात जितका पाऊस होतो, तेवढा पाऊस दिल्लीत केवळ ऑगस्ट महिन्यात झाला आहे. दिल्लीत गेल्या 25 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीही पडला नव्हता. तेवढा पाऊस दिल्लीत झाला आहे. मात्र तरीही नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला नाही.
17 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
भारतीय हवामान खात्याची माहीतीनुसार, 1 जून ते 18 ऑगस्टपर्यंत दिल्लीत सरासरी आद्रता ही 76.5 टक्के इतकी होती. 2008 नंतर ही दुसरी वेळ आहे. जेव्हा दिल्लीत सर्वाधिक आद्रता आहे. साधारणतः पावसाळ्यात दिल्ली सरासरी आद्रता ही 67.2 टक्के राहते. जून आणि जुलै महिन्यात पाऊस सुरू झाल्याने यावेळेस दिल्लीत आद्रता जास्त होती. ऑगस्टच्या सुरुवातीला दिवसांमध्ये आद्रतेची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर आद्रता वाढल्याने मागचे सगळे रेकॉर्ड मोडले गेले.
यावर्षी सगळीकडेच देशभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्वच राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. राजधानी दिल्लीत देखील ऑगस्ट महिन्यात संपूर्ण वर्षाचा पाऊस झाला आहे. त्यामुलेडीललीत यंदा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. राजधानी दिल्लीत आज देखील जोरदार पाऊस सुरू आहे. आज दिवसभर दिल्लीत पाऊस असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट
गेल्या तीन-चार दिवसांपासून दिल्ली-एनसीआरमध्ये पावसाचा वेग थांबला आहे. काही ठिकाणी दिवसाची सुरुवात तेजस्वी सूर्यप्रकाशाने होत आहे आणि दिवसभर दमट उष्णतेमुळे लोकांची तब्येत खराब होताना दिसत आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.
Rain Update : महाराष्ट्र, उत्तराखंडसह अनेक राज्यांना पावसाचा अलर्ट; पुढील 24 तासांत…
आयएमडीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी (दि.22) मान्सून पुन्हा वेग पकडणार असल्याचा अंदाज आहे. अनेक राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीमध्ये शुक्रवारी पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे.