Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jammu & Kashmir High Alert: जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट! दहशतवाद्यांच्या IED हल्ल्याचा कट

गुप्तचर माहितीमुळे, दहशतवादी आयईडी स्फोट आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्याची त्यांची पूर्वीची पद्धत पुन्हा वापरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 26, 2026 | 01:15 PM
Jammu Kashmir News 2026, J&K High Alert, Terrorist IED Plot, Indian Army

Jammu Kashmir News 2026, J&K High Alert, Terrorist IED Plot, Indian Army

Follow Us
Close
Follow Us:
  • जम्मू-कश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • बुलेटप्रूफ वाहनांमधूनच गस्त घालण्याचा आणि कारवाई करण्याचा सल्ला
  • संवेदनशील ठिकाणे निश्चित करून ‘शोधा आणि मारा’ (Spot and kill) मोहीम
Jammu Kashmir News: जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे, संपूर्ण जम्मू-कश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दहशतवादी संघटना आयईडी (Improvised Explosive Device) वापरून सुरक्षा दलांवर मोठा हल्ला करण्याचे प्लॅनिंग करत असल्याची मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी ही सतर्कता सर्व सुरक्षा यंत्रणा आणि सैन्याची तैनाती वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलांना त्यांच्या हालचाली मर्यादित ठेवण्याचे आणि बुलेटप्रूफ नसलेल्या वाहनांचा वापर टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून, आता केवळ बुलेटप्रूफ वाहनांमधूनच गस्त घालण्याचा आणि कारवाई करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त दक्षता घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

India Lockdown Again : भारत पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने? मोदींचं ‘ते’ वक्तव्य अन् …; काय आहे सत्य?

संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई

गुप्तचर माहितीमुळे, दहशतवादी आयईडी स्फोट आणि त्यानंतर अंदाधुंद गोळीबार करण्याची त्यांची पूर्वीची पद्धत पुन्हा वापरू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, सुरक्षा दलांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्याचे आणि एसओपीनुसार (SOPs) कार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या, यंत्रणा संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी सतर्क आहेत.

महामार्ग आणि दुर्गम भागांवर विशेष लक्ष

याशिवाय, संभाव्य दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यातील सुरक्षा व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेतला जात आहे. काही संवेदनशील ठिकाणे निश्चित करून ‘शोधा आणि मारा’ (Spot and kill) मोहीम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू आणि काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराचे जवान या भागांमध्ये स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे दहशतवादविरोधी कारवाया करत आहेत. महामार्ग आणि दुर्गम मार्गांवरही बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या कारवायांमध्ये ड्रोन आणि स्निफर श्वानांनाही तैनात करण्यात आले आहे.

IRCTC Fined: निकृष्ट अन्न पुरवठ्याप्रकरणी भारतीय रेल्वेची मोठी कारवाई! IRCTC ला १० लाख, तर पुरवठादाराला ५० लाखांचा दंड

आयईडी स्फोट किती धोकादायक असतात?

दहशतवादी संघटना आणि नक्षलवादी मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यासाठी आयईडीचा वापर करतात. यामध्ये अत्यंत स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थ असतात, ज्यामुळे स्फोटानंतर लगेच आग लागते. आयईडी अनेकदा रस्त्याच्या कडेला किंवा पायवाटांवर लपवून ठेवलेले असतात आणि एखादी व्यक्ती किंवा वाहन त्यांच्या संपर्कात येताच त्यांचा स्फोट होऊ शकतो. ते रिमोट कंट्रोल किंवा इन्फ्रारेड ट्रिपवायरसारख्या साधनांनीही सक्रिय केले जाऊ शकतात. त्यानंतर होणाऱ्या स्फोटामुळे तीव्र ज्वाला आणि दाट धूर निर्माण होतो, ज्यामुळे नुकसान आणखी वाढते.

 

 

 

Web Title: High alert in jammu kashmir intelligence warns of massive ied blast plot by terror groups

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • IED Blast
  • Jammu Kashmir News
  • Terrorist Attack

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.