Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले- ‘जी टीम जगात…’

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले आणि ही याचिका "न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासारखी" असल्याचे स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 08, 2025 | 08:46 PM
'Team India' चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली (Photo Credit- X)

'Team India' चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाने याचिका फेटाळली (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Team India’ चे नाव बदलण्याच्या मागणीवर हायकोर्टाचा दणका
  • याचिका फेटाळली
  • कोर्टाने कडक शब्दाच फटकारले..
Team India News: भारतीय क्रिकेट संघाचे नाव बदलण्याची मागणी करणारी एक जनहित याचिका (PIL) दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) ‘टीम इंडिया’ (Team India) किंवा ‘इंडियन नॅशनल टीम’ (Indian National Team) सारखी नावे वापरण्यास मनाई करून केवळ ‘इंडियन क्रिकेट टीम’ हेच नाव वापरण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यावर मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फटकारले आणि ही याचिका “न्यायालयाचा वेळ वाया घालवण्यासारखी” असल्याचे स्पष्ट केले.

‘ती टीम इंडिया नाही तर कोण?’

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती गेडेला यांनी याचिकाकर्त्याला अत्यंत कडक शब्दांत प्रश्न विचारला, “तुम्ही असे म्हणण्याचा प्रयत्न करत आहात का की ही टीम भारताचे प्रतिनिधित्व करत नाही? जी टीम जगभर प्रवास करते आणि देशाला गौरव देते, ती ‘टीम इंडिया’ नाही का? जर नसेल तर मला सांगा – मग टीम इंडिया कोण आहे?”

Delhi High Court junks PIL seeking name change for Indian cricket team Read more: https://t.co/IF4eQQo1Qk pic.twitter.com/gu7ufw9oER — Bar and Bench (@barandbench) October 8, 2025

भारतीय क्रिकेट विश्वाकडून सैनिकांचा सन्मान! हवाई दल दिनानिमित्त विशेष आयोजन: ‘या’ दिग्गजांनीही दिल्या शुभेच्छा

क्रीडा संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्र

मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनीही या जनहित याचिकेत कोणताही ठोस पाया नसल्याचे सांगत याचिकाकर्त्याला फटकारले. ते म्हणाले, “हा न्यायालयाचा आणि तुमच्या वेळेचा पूर्णपणे अपव्यय आहे. राष्ट्रकुल किंवा ऑलिंपिकचा संघ असो, तो सरकारकडून निवडला जातो का? नाही, तरीही ते भारताचे प्रतिनिधित्व करतात. हॉकी, फुटबॉल, टेनिससह इतर खेळांनाही हेच लागू होते.”

कायदेशीर मत

खंडपीठाने स्पष्ट केले की, क्रिकेट संघाने राष्ट्रध्वज किंवा चिन्हाचा वापर करणे कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करत नाही. न्यायाधीशांनी निदर्शनास आणून दिले की क्रीडा संस्था सरकारी नियंत्रणापासून स्वतंत्रपणे काम करतात. खंडपीठाने याचिकाकर्त्याला विचारले, “तुम्हाला संपूर्ण क्रीडा व्यवस्था कशी काम करते हे माहित आहे का? जिथे जिथे खेळांमध्ये सरकारी हस्तक्षेप झाला आहे, तिथे आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) ने कठोर कारवाई केली आहे.” अशा याचिका केवळ न्यायालयीन वेळ वाया घालवत नाहीत, तर खेळांमध्ये राष्ट्रीय प्रतिनिधित्वाच्या भावनेलाही धक्का पोहोचवतात, असे स्पष्ट मत व्यक्त करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

Ab Devilliers on Rohit-Kohli: रोहित-कोहलीच्या भविष्यावर डिव्हिलियर्सचे खळबळजनक विधान; भारतीय चाहत्यांना हे वक्तव्य पचणार नाही!

 

Web Title: High court dismisses petition seeking change of name of team india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 08:46 PM

Topics:  

  • bcci
  • delhi high court
  • indian cricket team

संबंधित बातम्या

IND VS PAK : “आम्ही ज्योतिषी नाही…” पाकिस्तानविरुद्धच्या ‘त्या’ विषयावर BCCI का भडकली?
1

IND VS PAK : “आम्ही ज्योतिषी नाही…” पाकिस्तानविरुद्धच्या ‘त्या’ विषयावर BCCI का भडकली?

दिल्लीच्या विषारी हवेने बीसीसीआय देखील त्रस्त! स्पर्धेतील बाद फेरीचे सामने होणार या प्रसिद्ध मैदानावर
2

दिल्लीच्या विषारी हवेने बीसीसीआय देखील त्रस्त! स्पर्धेतील बाद फेरीचे सामने होणार या प्रसिद्ध मैदानावर

BCCI वर पैशांचा पाऊस…नवीन करारांमुळे महसूल कोट्यवधींनी वाढला! कमाई ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
3

BCCI वर पैशांचा पाऊस…नवीन करारांमुळे महसूल कोट्यवधींनी वाढला! कमाई ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

IPL 2026: आयपीएल लिलावात मोठी खळबळ! १० संघांच्या खिशात किती पैसे आणि किती जागा शिल्लक? वाचा एका क्लिकवर
4

IPL 2026: आयपीएल लिलावात मोठी खळबळ! १० संघांच्या खिशात किती पैसे आणि किती जागा शिल्लक? वाचा एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.