हवाई दल(फोटो : सोशल मीडिया)
Soldiers honored on Indian Air Force Day : ९३ व्या भारतीय हवाई दल दिनानिमित्त, भारतीय क्रिकेट विश्वाकडून हवाई दलातील शूर सैनिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय हवाई दलाच्या सेवेला आणि समर्पणाला देशभरातून मान्यता मिळाली आहे. या खास दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक क्रिकेटपटूंकडून देखील हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीसह ऑस्ट्रेलियात Cheating, बॉल बॅटला न लागताच अंपायरने दिले Out; माजली खळबळ
जगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २०१० मध्ये हवाई दलाचा मानद ग्रुप कॅप्टन बनला होता, असा सन्मान मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. सचिन तेंडुलकरने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. त्यावर त्याने लिहिले की, १.४ अब्जाहून अधिक भारतीयांच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना पंख देऊन, भारतीय हवाई दल आपल्या राष्ट्राचे धैर्य आणि समर्पणाने रक्षण करते आणि त्याला अधिक उंचीवर पोहोचण्यास मदत देखील करते. सचिन तेंडुलकरने पुढे लिहिले की, “भारतीय हवाई दलाचा भाग असल्याचा मला अभिमान आणि सन्मानही वाटतो. भारतीय हवाई दल दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!”
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी देखील लिहिले की, “आपल्या आकाशाच्या रक्षकांना सलाम!” गंभीर शिवाय माजी क्रिकेटपटू शिखर धवननेही हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
भारतीय क्रिकेटमध्ये त्याच्या स्फोटक सलामी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिखर धवन याने ‘X’ वर लिहिले, “जगातील सर्वोत्तम हवाई दलांपैकी एकाचा उत्सव साजरा करणाऱ्या आकाशाच्या खऱ्या स्वामींना सलाम.”
तसेच ९३ व्या भारतीय हवाई दल दिनानिमित्त “ऑपरेशन सिंदूर” चे विशेष स्मरण केले गेले. या समारंभात “ऑपरेशन सिंदूर” मध्ये शौर्याबद्दल देशाच्या शूर सैनिकांना सन्मानित करण्यात आले. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमावले होते, त्यानंतर भारताने ७ मे रोजी “ऑपरेशन सिंदूर” हे ऑपरेशन राबवून प्रत्युत्तरात्मक हल्ला केला.
हेही वाचा : Women World Cup 2025 : IND vs AUS सामन्यापूर्वी मोठी घोषणा! ‘या’ दोन माजी खेळाडूंचा होणार विशेष सन्मान
९३ व्या भारतीय हवाई दल दिनानिमित्त, संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी देखील हिंडन एअरबेस समारंभाला उपस्थिती लावली होती.