Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : पंतप्रधान मोदींच्या कर्जत दौऱ्याची चर्चा; संभाव्य कार्यक्रमासाठी रस्त्यांच्या डांबरीकरणाला वेग

Karjat News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य कर्जत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांचे डांबरीकरण आणि हेलिपॅड उभारणीची कामे सुरू झाली आहेत. टोरंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पुलाची वाडी आणि लाखाची वाडी परिसराची चर्चा आहे. मात्र दौऱ्याबाबत अधिकृत स्पष्टता नसल्याने स्थानिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 18, 2026 | 09:54 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • भूमिपूजनासाठी पुलाची वाडी, लाखाची वाडी चर्चेत
  • संभाव्य मार्गावरील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर
  • शेतकऱ्यांचा विरोध आणि दौऱ्याच्या निश्चिततेवर प्रश्न
Karjat News : कर्जत तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दौऱ्याची चर्चा सुरू झाली असून, प्रशासनाकडून तयारीला वेग आल्याचे चित्र आहे. टोरंट कंपनीच्या प्रस्तावित हायड्रॉलिक प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान कर्जतमध्ये येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण आणि हेलिपॅड उभारणीची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, पंतप्रधानांचा दौरा निश्चित झाला आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

भूमिपूजनासाठी पुलाची वाडी, लाखाची वाडी चर्चेत

पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायत हद्दीतील सायडोंगर येथे टोरंट कंपनीकडून प्रस्तावित हायड्रॉलिक प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्जतला येण्याची चर्चा आहे. भालिवडी ग्रामपंचायत हद्दीतील पुलाची वाडी आणि लाखाची वाडी येथील शासकीय जमिनीवर भूमिपूजन सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Senior Citizen Rehabilitation : MDL च्या CSR उपक्रमांतर्गत वांद्रे येथे PMD-VK केंद्राचे उद्घाटन

संभाव्य मार्गावरील रस्त्यांची कामे युद्धपातळीवर

३ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रात ते कर्जत तालुक्याला भेट देणार असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आंबिवली फाटा ते भीमाशंकर घाट रस्त्यालगत नागेरे फाट्यावरून सावळे गावाकडे जाणाऱ्या मार्गाचे काम सुरू झाले आहे. यापूर्वी हा रस्ता प्रामुख्याने पायी जाण्यासाठी आणि बैलगाडीच्या वापरासाठी होता. आता त्याचे नव्याने बांधकाम केले जात आहे.

बुलढाण्यात पाणीटंचाईचं संकट? आमदार संजय गायकवाडांकडून आढावा; अधिकाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश

शेतकऱ्यांचा विरोध आणि दौऱ्याच्या निश्चिततेवर प्रश्न

टोरंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याचे सांगितले जात आहे. हा विरोध कायम असताना भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरू झाल्याने स्थानिकांमध्ये चर्चा रंगली आहे. पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्यासाठी हेलिपॅडची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसाठीही स्वतंत्र हेलिपॅड उभारण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान खरोखरच कर्जतमध्ये येणार का आणि शेतकऱ्यांच्या विरोधाचे काय होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Web Title: Karjat news buzz surrounds pm modis potential visit to karjat road asphalt paving work accelerated in preparation for the likely eventcp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • narendra modi

संबंधित बातम्या

Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप
1

Matheran News : मिनीबस चालकाची ज्येष्ठ नागरिकांशी अरेरावी; माथेरानच्या प्रवासात प्रवाशांचा संताप

Middle East : सौदीच्या मदतीला धावला इजिप्त ;हुथींच्या हल्यांमुळे सौदी बेजार
2

Middle East : सौदीच्या मदतीला धावला इजिप्त ;हुथींच्या हल्यांमुळे सौदी बेजार

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव
3

World Economy : विकसनशील देशावर कर्जाचा ताण ;जागतिक बँकेच्या बैठकीत उपायांचा अभाव

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)
4

Kolhapur: ‘गोकुळ टिकवण्याचं राजकारण जिंकणार’; सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल (Video)

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.