नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी जगभरासह देशात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहेत. भारतात देखील हळू हळू कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसून येत आहेत. राजधानी नवी दिल्लीत देखील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यावरत दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी भाष्य केले आहे.
राजधानी दिल्लीत एकाच दिवशी १०० पेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता दिल्लीचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे. दिल्ली सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच रूग्णालयांना योग्यते निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली आहे.
राजधानी दिल्लीत कोरोनाचे १०४ रूग्ण
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीत सध्या कोरोनाचे १०४ रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान दिल्ली सरकारने काही सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा रूग्णालयात बेड, ऑक्सीजन, आवश्यक औषधांचा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
काय म्हणाले आरोग्य मंत्री पंकज सिंह?
सध्या जे रूग्ण आढळून येत आहेत, त्यांची तपासणी केली जात आहे. हे दिल्लीतील प्रवासी आहेत की बाहेरून आले आहेत, हे समजण्यास मदत होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशभरात १००९ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वात जास्त रूग्ण हे केरळमध्ये सापडले आहेत. केरळमध्ये ४५० रूग्ण आढळून आले आहेत.
राज्यात कोरोनाचा पहिला बळी
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात कोविड-१९ चे ४५ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईतील आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यभरात एकूण ६,८१९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी २१० नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांपैकी १८३ रुग्ण केवळ मुंबईतील आहेत.इतर जिल्ह्यांमध्येही काही रुग्ण आढळले असून, पुण्यात ४, रायगड आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी २ तर ठाणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१० वर पोहोचली असून, त्यापैकी ८१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.
Corona Update: राज्यात कोरोनाचा पहिला बळी; ‘या’ जिल्ह्यात २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू
देशभरात कोविडचं थैमान पुन्हा एकदा सुरु झालं. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कोविड रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे मनपा हद्दीत देखील गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले त्याचवेळी कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.