ठाण्यात कोरोना रूग्णाचा मृत्यू (फोटो- istockphoto)
ठाणे: जगभरात कोरोना व्हायरसने पुन्हा डोके वर काढले आहे. भारतात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. अनेक शहरांमध्ये रूग्ण संख्या वाढत आहेत. त्यातच आता ठाणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ठाणे जिल्ह्यात एका कोरोना रूग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.
ठाणे जिल्ह्यात कोरोनामुळे २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील एका रूग्णालयातील या २१ वर्षांच्या तरुणावर कोरोनाचे उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत.
मुंबईनंतर ठाण्यातही कोविडचे रुग्ण
जगभरातील अनेक देशांमध्ये करोना विषाणूच्या नवीन व्हेरिएंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून, पुणे, मुंबई पाठोपाठ ठाण्यातही करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात 40 खाटांचे विशेष कक्ष तातडीने तयार करण्यात आला असून, यामध्ये रुग्णांना लागणाऱ्या सर्व वैद्यकीय यंत्रणा सुसज्ज ठेवल्या आहेत.
Thane News : मुंबईनंतर ठाण्यातही कोविडचे रुग्ण; आरोग्य यंत्रणा अलर्टमोडमध्ये
देशभरात कोविडचं थैमान पुन्हा एकदा सुरु झालं. देशाच्या विविध कानाकोपऱ्यात कोविड रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता राज्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ठाणे मनपा हद्दीत देखील गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसात कोरोनाचे 10 रुग्ण आढळले त्याचवेळी कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तसेच सर्व रुग्णालयांनी सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले. तसेच, कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे.
Maharashtra Covid News: सावध व्हा..! मायानगरीत दहशत; महाराष्ट्रात इतक्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात इतक्या कोरोना रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात कोविड-१९ चे ४५ नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी सर्वाधिक ३५ रुग्ण मुंबईतील आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत राज्यभरात एकूण ६,८१९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी २१० नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. या रुग्णांपैकी १८३ रुग्ण केवळ मुंबईतील आहेत.इतर जिल्ह्यांमध्येही काही रुग्ण आढळले असून, पुण्यात ४, रायगड आणि कोल्हापूरमध्ये प्रत्येकी २ तर ठाणे आणि लातूरमध्ये प्रत्येकी १ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१० वर पोहोचली असून, त्यापैकी ८१ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत.