Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना बसतोय फटका; खाद्यतेलाच्या दरात वाढ

महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना मलेशियाने तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केल्याने केंद्र सरकारच्या खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांना तडा गेला आहे. परिणामी, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचा खुश ठेवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 13, 2024 | 03:34 PM
वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना बसतोय फटका; खाद्यतेलाच्या दरात वाढ
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले असताना मलेशियाने तेलाच्या निर्यात शुल्कात वाढ केल्याने केंद्र सरकारच्या खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या प्रयत्नांना तडा गेला आहे. परिणामी, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मतदारांचा खुश ठेवण्याच्या प्रयत्नांवर पाणी फेरले गेले.

गेल्या दहा दिवसांत सोयाबीन, सनफ्लॉवर आणि शेंगदाणे तेलाच्या दरात प्रति किलो पाच रुपयांची वाढ झालेली आहे. आता होळी, रमझान आणि त्यानंतर लग्नसराई असल्याने भाव कमी होण्याची शक्यता मावळली आहे. खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलल्याने काही काळ ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र, मलेशिया सरकारने पाम तेलाच्या निर्यात शुल्कात वाढीचा निर्णय घेतला. त्याचा फटका ग्राहकांना बसू लागला आहे.

केंद्र सरकारने दोनदा आयात शुल्कात कपात केली होती. ती कपात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, अशी चर्चा होती. खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात राहतील. सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडणार नाही, अशी शक्यताही व्यक्त केली जात होती. मलेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर अधिक शुल्क आकारण्याच्या निर्णय घेतल्याने खाद्यतेल महाग होणे सुरू झाले आहे.

पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीन, सनफ्लॉवर आणि शेंगदाणे तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. भारताला गरजेच्या तब्बल 65 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. आयातीतही पामतेलाचा वाटा तब्बल 70 टक्के आहे. इंडोनेशियामध्ये पामतेल बायोडिझेलसाठी वापरले जाते.

Web Title: Increase in price of edible oil inflation is also increases nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • Indian Economy
  • Indonesia

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.