Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi on Work From Home : नरेंद्र मोदींकडून ‘वर्क-फ्रॉम-होम’ चे आवाहन!काटकसर की संकटाची चाहूल?

PM Modi on Work From Home पाच-सहा वर्षांच्या कालावधीनंतर आता सरकार पुन्हा एकदा मर्यादित स्वरूपात ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यावर चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 11, 2026 | 01:13 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी, वर्क फ्रॉम होम, इंधन बचत,

पंतप्रधान नरेंद्र मोदी, वर्क फ्रॉम होम, इंधन बचत,

Follow Us
Follow Us:
  • इंधन वापर कमी झाल्यास आयात खर्च कमी होईल आणि परकीय चलन (Foreign Exchange) वाचण्यास मदत होईल.
  • रस्त्यांवरील वाहने कमी झाल्यास कार्बन उत्सर्जन कमी होऊन प्रदूषणाची पातळी लक्षणीयरीत्या घटू शकते
  • ‘वर्क-फ्रॉम-होम’मुळे सार्वजनिक वाहतूक आणि शहरातील वाहतूक कोंडी (Traffic Jams) कमी होण्यास मदत होईल
PM  Narendra Modi Work From Home :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत ऊर्जा संवर्धन अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात अवलंबलेल्या ‘वर्क-फ्रॉम-होम’ (Work From Home)  मॉडेलचाही उल्लेख केला आणि कंपन्या व संस्थांनी शक्य असेल तिथे घरून काम करण्याच्या पर्यायाचा पुनर्विचार करावा, असे सांगितले.पंतप्रधान मोदींच्या या भाषणाचा नेमका हेतू काय होता, त्यामागे काय कारण असू शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

याचे कारण समोर आले आहे. इंधन बचत हा आता केवळ पर्यावरणाचा विषय राहिलेला नसून तो देशाच्या आर्थिक सामर्थ्याशीही जोडला गेला आहे. वाढते प्रदूषण, वाढत्या जागतिक ऊर्जा किंमती आणि तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर परकीय चलनावरील दबाव कमी करण्यासाठी देशातील इंधनाचा वापर कमी करणे हे आवश्यक आहे, हा संदेश पंतप्रधानांनी अधोरेखित केला आहे.

PM Narendra Modi: “घरून काम करा, पेट्रोल-डिझेल वाचवा”; भारताकडे तेलाच्या मोठ्या विहिरी नाहीत, मोदींचं स्पष्ट वक्तव्य

कोविड काळात ‘वर्क फ्रॉम होम’चा मोठ्या प्रमाणावर वापर

भारतामध्ये कोविड-१९ महामारीच्या काळात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय समोर आला. आयटी, मीडिया, बँकिंग, कन्सल्टिंगसह अनेक क्षेत्रांतील कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती. यामुळे कार्यालयात जाणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली, रस्त्यांवरील वाहनांची संख्या घटल्याने आपोआपच वाहतूकही घटली. या काळात आणि पेट्रोल-डिझेलचा वापरही कमी झाला. पर्यायाने प्रदूषणाच्या पातळीतही लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले.

पाच-सहा वर्षांच्या कालावधीनंतर आता सरकार पुन्हा एकदा मर्यादित स्वरूपात ‘वर्क फ्रॉम होम’ किंवा हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्यावर चर्चा करत असल्याची माहिती समोर येत आहे. घरून काम करण्याचा किंवा हायब्रीड पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे इंधन बचत होणे. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांना रोजच्या प्रवासासाठी कमी पेट्रोल आणि डिझेल वापरावे लागेल. त्यामुळे वाहतूक कोंडी तसेच सार्वजनिक वाहतुकीवरील ताणही कमी होऊ शकतो. याशिवाय, शहरांमधील प्रदूषणाची पातळी कमी होण्यासही मदत होईल.

Shashi Tharoor: लोकशाहीचा हा कोणता खेळ? BJPचा 30 लाखांनी विजय पण वगळले 34 लाख मतदार; शशी थरूर यांचा बंगाल ‘डाटा’ VIRAL

घरून काम करण्याचे फायदे

घरून काम केल्यामुळे कर्मचाऱ्यांचा रोजच्या प्रवासातील वेळ वाचतो. हा वेळ ते कुटुंबासाठी किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी वापरू शकतात. कंपन्यांचाही कार्यालयीन खर्च, वीज आणि इतर सुविधांवरील खर्च कमी होऊ शकतो.

तथापि, प्रत्येक क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य नाही. उत्पादन, वाहतूक, किरकोळ विक्री, रुग्णालये आणि इतर भौतिक सेवा क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते. मात्र, भारताची डिजिटल अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अशा नोकऱ्या उपलब्ध करून देते, ज्या हायब्रीड किंवा रिमोट मॉडेलमध्ये सहजपणे चालवता येऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारने कंपन्यांना प्रोत्साहन देत राज्यांच्या सहकार्याने ‘ग्रीन वर्क पॉलिसी’सारख्या योजना राबवल्यास भारत तेल आयातीवरील खर्च लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. त्यामुळे देशावरील आर्थिक दबाव कमी होण्यास मदत होईल आणि रुपयाची स्थितीही अधिक मजबूत होऊ शकते.

 

 

Web Title: What exactly is the reason behind narendra modis appeal for work from home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 01:13 PM

Topics:  

  • Climate Change
  • Indian Economy
  • PM Narendra Modi
  • Work From Home

संबंधित बातम्या

US-India Trade: भारतासाठी मोठा आर्थिक दिलासा! मोठ्या करारापूर्वी ट्रम्प यांची मोठी खेळी; ‘या’ 4 भारतीय कंपन्यांना ग्रीन सिग्नल
1

US-India Trade: भारतासाठी मोठा आर्थिक दिलासा! मोठ्या करारापूर्वी ट्रम्प यांची मोठी खेळी; ‘या’ 4 भारतीय कंपन्यांना ग्रीन सिग्नल

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा
2

‘राम मंदिरातील देणग्यांच्या हिशोबावर प्रश्नचिन्ह’; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप, केंद्र सरकारवरही साधला निशाणा

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?
3

BJP Politics : भाजप पक्षसंघटनेतही होणार मोठे फेरबदल; अडवाणी, जोशींना मिळणार डच्चू?

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम
4

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.