Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Economy: किचनचे बजेट कोलमडले! किरकोळ महागाई ३.४८ टक्क्यांवर; सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री

Indian Economy-  नारळ, टोमॅटो आणि फ्लॉवरसारख्या दैनंदिन वापरातील भाज्यांच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. राज्यनिहाय विचार केला असता Telangana मध्ये सर्वाधिक ५.८१ टक्के महागाई नोंदवण्यात आली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 06:10 PM
India Retail Inflation April 2026, Consumer Price Index CPI Data, Food Inflation India, PM Modi

India Retail Inflation April 2026, Consumer Price Index CPI Data, Food Inflation India, PM Modi

Follow Us
Follow Us:
  • देशातील किरकोळ महागाईचा दर (CPI) ३.४८ टक्क्यांवर पोहोचला असून सलग सहाव्या महिन्यात महागाई वाढल्याने मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित बिघडले आहे.
  • अन्न आणि पेयांची महागाई ४.२० टक्क्यांवर गेल्याने किचनचे बजेट कोलमडले असून चांदीच्या दागिन्यांच्या किमतीत १४४ टक्क्यांहून अधिक मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
  • महागाई कमी न झाल्यास रिझर्व्ह बँक (RBI) व्याजदरांबाबत कठोर निर्णय घेण्याची शक्यता असून, यामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हप्ते (EMI) महाग होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Indian Economy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला सोने न खरेदी करण्याचे आणि पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे जे आवाहन केले आहे, त्यामुळे मध्यमवर्ग आणि व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. त्यातच सलग सहाव्या वाढलेल्या महागाईने महिन्यात मध्यमवर्गीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. देशातील किरकोळ महागाई दर्शवणारा ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय) ३.४८% वर पोहोचला आहे. यापूर्वी मार्च २०२६ मध्ये हा निर्देशांक ३.४०% होता.

जर आगामी काळात खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्या नाहीत, तर आरबीआय व्याजाबाबत कठोर भूमिका घेऊ शकते. अशा परिस्थितीत ईएमआयपासून दैनंदिन खर्चापर्यंत सर्वच बाबतीत सामान्यांवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीच्या किमतीतही वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

किचनचे बजेट कोलमडले

खाद्य वस्तूची महागाई वाढून ४.२०% झाली आहे. ग्रामीण भागात ही महागाई ४.२६% तर शहरी भागात ४.१०% राहिली आहे. याचा थेट परिणाम किचनच्या बजेटवर होणार आहे. अहवालानुसार, एप्रिलमध्ये अन्न आणि पेयांची महागाई ४.०१% नोंदवण्यात आली, चांदीच्या दागिन्यांची महागाई दर १४४ ३४% राहिली, तर सोने, हिरे आणि प्लेटिनमचे दागिने ४०.७२% महाग झाले आहेत. नारळ, टोमॅटो आणि फ्लॉवरच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे, राज्यांचा विचार केला तर तेलंगणामध्ये सर्वाधिक ५.८१% महागाई नोंदवली गेली.

खाद्यपदार्थांच्या महागाईतही मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. खाद्य महागाईचा दर ४.२० टक्क्यांवर गेला असून ग्रामीण भागात तो ४.२६ टक्के तर शहरी भागात ४.१० टक्के राहिला आहे. याचा थेट परिणाम घरगुती किचन बजेटवर होत आहे.

अहवालानुसार, एप्रिल महिन्यात अन्न आणि पेय पदार्थांची महागाई ४.०१ टक्के नोंदवली गेली. चांदीच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये १४४.३४ टक्क्यांची वाढ झाली असून, सोने, हिरे आणि प्लेटिनम दागिन्यांच्या किमती तब्बल ४०.७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे लग्नसराई आणि गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करणाऱ्या कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण निर्माण होत आहे.

 

Sonia Gandhi Health : मोठी बातमी! सोनिया गांधी मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

३.५ कोटींच्या उपजीविकेवर संकट

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ‘अखिल भारतीय ज्वेलर्स आणि सुवर्णकार महासंघ ने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून आपली चिता व्यक्त केली आहे. संघटनेच्या मते, जर सोन्याच्या मागणीत मोठी घट झाली, तर देशातील सुमारे ३.५ कोटी लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ शकतो, या क्षेत्रात छोटे सराफ, कारागीर, डिझाइनर, पॉलिश करणारे आणि वाहतूकदार असे अनेक घटक जोडलेले आहेत. मागणी कमी झाल्यास या सर्वांच्या रोजगारावर गदा येईल, असे या पत्रात म्हटले आहे.

इंधन दरवाढीचे संकेत

जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयावरील दबाव यामुळे आगामी काळात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढून त्याचा परिणाम पुन्हा वस्तूंच्या दरांवर होऊ शकतो.

याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून इंधन बचत, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि अनावश्यक खर्च टाळण्यावर भर दिला जात आहे. मात्र, वाढती महागाई, इंधन दरवाढीची शक्यता आणि दैनंदिन खर्चातील वाढ यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडताना दिसत आहे.

 

 

Web Title: Indian economy india retail inflation april 2026 consumer price index cpi data food inflation india pm modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • budget 2026
  • Gold Price
  • Indian Economy
  • RBI

संबंधित बातम्या

RBI Unclaimed Money : …अन् बँकांमध्ये पडून राहिले हजारो कोटी! ‘लावारिस’ पैशांच्या यादीत SBI अव्वल; तुमचे पैसे कसे शोधायचे?
1

RBI Unclaimed Money : …अन् बँकांमध्ये पडून राहिले हजारो कोटी! ‘लावारिस’ पैशांच्या यादीत SBI अव्वल; तुमचे पैसे कसे शोधायचे?

Destroyed Cash : 5 लाखांच्या नोटा किड्यांनी कुरतडल्या, बँकेनेही बदलण्यास दिला नकार? नेमका काय आहे नियम?
2

Destroyed Cash : 5 लाखांच्या नोटा किड्यांनी कुरतडल्या, बँकेनेही बदलण्यास दिला नकार? नेमका काय आहे नियम?

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
3

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा
4

Gold Hallmarking : सोन्याची खरेदी करताय? सरकारने घेतला मोठा निर्णय, फसवणूक टाळण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की तपासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.