Congress on Mamata Banerjee : “ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच होऊ शकत नाही”; काँग्रेसकडून डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न
नवी दिल्ली : देशातील विरोधकांनी इंडिया आघाडीची मूठ एकत्रित बांधलेली असताना, आता लोकसभेच्या जागेवरून इंडिया आघाडीत उभी फूट पडली असल्याची दिसून येत आहे. दरम्यान, तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर लोकसभा लढवणार असल्याची घोषणा नुकतीच ममता बॅनर्जींनी केली आहे. यामुळं भाजपला सत्तेतून खाली खेचण्याच्या इंडिया आघाडीच्या मनसुब्यांना धक्का बसला आहे. ममतांच्या या घोषणेवर काँग्रेसनं ममतांशिवाय इंडिया आघाडीचा विचारच करु शकत नाही अशा शब्दांत डॅमेज कन्ट्रोलचा प्रयत्न केला आहे.
#WATCH | Barpeta | On Mamata Banerjee's remark, Congress General Secretary in-charge Communications, Jairam Ramesh says, "TMC is a pillar of the INDIA alliance. We cannot imagine the INDIA alliance without Mamata ji. Tomorrow our Yatra is entering West Bengal. Discussions… pic.twitter.com/QrR4XYIEKq
— ANI (@ANI) January 24, 2024
तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीतील एक मजबूत खांब
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटलं की, “तृणमूल काँग्रेस हा इंडिया आघाडीतील एक मजबूत खांब आहे. त्यामुळं ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीचा आम्ही विचारच करु शकत नाही. उद्या आमची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करत आहे. सध्या इंडिया आघाडीत जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाली असून लवकर याची घोषणा होईल, त्यानंतर सर्वजण समाधानी झालेले असतील.