India Alliance online meeting with 24 party leaders Before Parliament Monsoon Session 2025
INDIA Alliance Online Meeting : नवी दिल्ली : लवकरच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. यापूर्वी विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची तयारी सुरु केली आहे. विरोधकांची एकत्रित आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची बैठक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश मिळवलेल्या इंडिया आघाडीच्या या बैठकीने राष्ट्रीय राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय असे अनेक महत्त्वपूर्ण नेते सहभागी झाले होते.
मागील अनेक दिवसांपासून इंडिया आघाडीची बैठक व्हावी अशी मागणी केली जात होती. अखेर काल (दि.19) इंडिया आघाडीची ऑनलाईन स्वरुपामध्ये बैठक पार पडली. यामध्ये विरोधातील प्रमुख 24 पक्षांच्या नेत्यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली, या बैठकीमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर अचानक थांबवणे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यस्थीचे दावे, बिहारमध्ये सुरू असलेले विशेष गहन पुनरावलोकन (SIR) आणि इतर अनेक मुद्द्यांवर संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती यावर चर्चा झाली. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत आहे आणि 21 ऑगस्टपर्यंत एकूण 21 बैठका घेण्याचे नियोजन सुरु आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
इंडिया आघाडीच्या या ऑनलाईन बैठकीमध्ये विरोधातील महत्त्वाचे 24 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, राष्ट्रवादी (शरद पवार गट) शरद पवार, शिवसेनेचे (ठाकरे गट) उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनचे सरचिटणीस दीपकर भट्टाचार्य आणि इतर काही नेते उपस्थित होते.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील ऑनलाईन स्वरुपामध्ये या बैठकीमध्ये उपस्थिती लावली. याची माहिती त्यांनी ऑफिशियल अकाऊंटवरुन दिली आहे. शरद पवार यांनी ऑनलाईन मिटिंगचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया आघाडी’ची ऑनलाइन बैठक आज पार पडली. २४ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित होते. येणाऱ्या संसदीय अधिवेशनात देशासमोरील प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका घेण्यासाठी, तसेच विरोधी पक्षांतील समन्वय यावर सखोल चर्चा झाली, अशी माहिती राज्यसभा खासदार शरद पवार यांनी दिली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘इंडिया आघाडी’ची ऑनलाइन बैठक आज पार पडली. २४ विरोधी पक्षांचे नेते या बैठकीस उपस्थित होते. येणाऱ्या संसदीय अधिवेशनात देशासमोरील प्रश्नांबाबत प्रभावी भूमिका घेण्यासाठी, तसेच विरोधी पक्षांतील समन्वय यावर सखोल चर्चा झाली.
Ahead of the… pic.twitter.com/XTjmp0DALM
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 19, 2025