Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन रंगलं राजकारण! शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना धरलं धारेवर

अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावरुन जेष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये वाद सुरु झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 04, 2026 | 12:19 PM
Sharad Pawar and CM Devendra Fadnavis clash over the merger of the two ncp political news

Sharad Pawar and CM Devendra Fadnavis clash over the merger of the two ncp political news

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत राजकारण सुरु
  • देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळली चर्चा
  • शरद पवारांचे फडणवीसांना सडेतोड उत्तर
मुंबई : राष्ट्रवादीचा एक गट सत्तेमध्ये आहे तर दुसरा गट विरोधामध्ये आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरुन जोरदार राजकारण रंगले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सुनेत्रा पवार गटनेत्या देखील झाल्या आहेत. मात्र अद्याप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा निर्णय घेणे बाकी आहे. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला. यावरुन जेष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये वाद-विवाद सुरु आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा निर्णय घेतला होता मात्र त्यापूर्वीच नियतीने डाव खेळला अशी चर्चा सुरु होती. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांनी दुजोरा दिला. तसेच शरद पवारांनी देखील याच्या समर्थनार्थ वक्तव्य केले. अजितदादा यांच्या राष्ट्रवादीशी विलीनि‍करणाची चर्चा सुरू होती. 12 फेब्रुवारी रोजी अजितदादा याविषयीची घोषणा करणार होते असे यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले होते. यावरुन मोठा वाद निर्माण झाला असून यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

हे देखील वाचा : मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट अखेर हटवली; वाय. खेमचंद सिंह असणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणावर प्रतिक्रिया देत मी काही आता बोलत नाहीये ही ती वेळ नाही असे वक्तव्य केले. फडणवीस म्हणाले की, सध्याची परिस्थिती अशी आहे त्यामुळे आम्हाला राजकारण करायचं नाही. अन्यथा मी अनेक गोष्टी सांगू शकतो. मला सगळं माहिती आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की, अजितदादा आणि माझे जे संबंध होते त्यामुळे ते सगळ्या गोष्टी मला शेअर करायचे.त्यांनी अशी काही तारीख ठरली असती तर मला सांगितलंच असतं. कारण ते आमच्या सरकारमध्ये सुद्धा होते. त्यामुळे मला वाटतं की खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. अजित पवार हे जर अशा प्रकारची कोणत्याही विलीनि‍करणाची चर्चा करत असते तर ती भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित करत प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील वाचा : सुनेत्रा पवार यांच्याकडेच असतील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे; येत्या 9 फेब्रुवारीला…

यावरुन शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचा खरपूस समाचार घेतला. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याचा शरद पवारांनी खरपूस समाचार घेतला आहे. शरद पवार म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असे शरद पवार म्हणाले. जयंत पाटील आणि अजित पवार हे यावर चर्चा करत होते, असे त्यांनी पुन्हा नमूद केले. त्यामुळे राष्ट्रवादी विलीनिकरणाच्या चर्चा सुरू होती असं शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.

Web Title: Sharad pawar and cm devendra fadnavis clash over the merger of the two ncp political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास
1

Devendra Fadnavis: माथाडी कामगारांसाठी मोठी घोषणा! वडाळ्यात 3 हजार घरे; वाशी मार्केट यार्डचाही होणार पुनर्विकास

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
2

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
3

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.