कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळताना व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला (फोटो - एक्स)
Manikrao Kokate Junglee Rummy : मुंबई : राज्याचे नुकतेच पावसाळी अधिवेशन झाले असून यामध्ये सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार वादंग झाल्याचे दिसून आले आहे. अनेक विषयांवरुन नेत्यांमध्ये खडाजंगी झाल्याचे दिसून आले. दरम्यान, यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्येमध्ये देशामध्ये सर्वात पुढे असताना कृषीमंत्री हे जंगली रमी खेळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे.
आमदार रोहित पवार हे सध्या चर्चेमध्ये आले आहेत. त्यांची पोलिसांसोबत झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे आता रोहित पवार यांनी कृषीमंत्र्यांचा धक्कादायक व्हिडिओ शेअर केला आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर थेट व्हिडिओ शेअर करुन अनेक जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर शेतकरी आत्महत्येची मोठी संख्या वाढलेली असताना तसेच राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफी दिली जात नसताना माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर गेम खेळत असल्यामुळे टीका केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, “जंगली रमी पे आओ ना महाराज…!” सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी. रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतरची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा प्रश्न आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलमध्ये गेम खेळत आहे. ऑनलाईन पत्त्यांची गेम खेळत असलेले माणिकराव कोकाटे हे टेबलाखाली गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. सदर व्हिडिओ हा विधान परिषदेमधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!”
सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.
रस्ता भरकटलेल्या… pic.twitter.com/52jz7eTAtq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 20, 2025
त्याचबरोबर शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील सोशल मीडियावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी माणिकराव कोकाटे यांना टोला लगावून शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी… असे लिहिले आहे. आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनो विसरा हमी …खेळा रम्मी… pic.twitter.com/GSzJHqYqP7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 20, 2025