Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan Conflict: भारताच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ; 2013-14 च्या तुलनेत अडीचपट वाढ

गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण तयारीला बळकटी देण्यासाठी आवश्यक पावले उचलल्यामुळेच हे शक्य झाले आहे. देशाच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 14, 2025 | 01:28 PM
India-Pakistan Conflict: भारताच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ; 2013-14 च्या तुलनेत अडीचपट वाढ
Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan Conflict: भारत-पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षामुळे पाकिस्तानची पुरती दाणादाण उडाली. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर देत त्यांची जागा दाखवून दिली. विशेष म्हणजे या युद्धसदृश परिस्थितीमुळे पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगालाही भारताची ताकद दिसून आली. भारतीय लष्करी शस्त्रांची ताकद पाहून शत्रू देशालाही घाम फुटला. सुदर्शन एस ४००, ब्रह्मोसपासून ते राफेलपर्यंत, भारताच्या संरक्षण यंत्रणेने आपली ताकद दाखवून दिली आहे.

गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण तयारीला बळकटी देण्यासाठी आवश्यक पावले उचलल्यामुळेच हे शक्य झाले आहे. देशाच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०१३-१४ या काळात देशाचे संरक्षण बजेट २.५३ लाख कोटी रुपये होते, त्यात आता २०२५-२६ मध्ये ६.८१ लाख कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ भारताच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी दर्शवते असे नाही, तर ‘स्वावलंबी भारत’ या दृष्टिकोनाकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणूनही पाहिले जात आहे.”

आधी कसोटीला रामराम, आता मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घेतली भेट! Rohit Sharma ‘राजकीय खेळी’साठी सज्ज?

धोरणात्मक सुधारणा, खाजगी कंपन्यांची भागीदारी आणि तांत्रिक नवोपक्रमामुळे भारतातील स्वदेशी संरक्षण उत्पादनाला नवीन गती मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रातील ही वाढ आता केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जगासमोर भारताला एक विश्वासार्ह संरक्षण निर्यातदार म्हणूनही ओळखले गेल्याचा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

भारताकडून अनेक देशांना संरक्षण उपकरणे निर्यात

संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारत आता अनेक देशांना संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान निर्यात करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे देशातील संरक्षण क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढली आहे आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. संरक्षण बजेटमधील ही वाढ केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही तर देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेमुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे परकीय चलनाचीही बचत होईल.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! PMPML च्या ताफ्यात दाखल होणार आणखी एक हजार बसेस

भारताच्या लष्करी ताकदीत वाढ

गेल्या काही वर्षांपासून भारत आपले लष्करी सामर्थ्य सतत वाढवत आहे. राफेल करार असो किंवा इतर कोणताही. भारत आपल्या सैन्याला प्रगत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्यात अजिबात मागे नाही. सध्या भारताकडे अशी अनेक घातक शस्त्रे आहेत, जी शत्रू सैन्याला उडवून देण्यासाठी पुरेशी आहेत.

 

Web Title: India pakistan conflict increase in indias defense budget 25 times increase compared to 2013 14

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 01:28 PM

Topics:  

  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर
1

‘दहशतवादाचा गौरव थांबवा’ ; UN मध्ये पाकिस्तान पंतप्रधानांच्या ‘ढोंगीपणा’वर दिले प्रत्युत्तर

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
2

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
3

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
4

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.