Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Russia Deal: अमेरिकेला दणका! भारताचा रशियासोबत विमान निर्मीतीचा ऐतिहासिक करार

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराच्या माध्यामातून भारताने पहिल्यांदाच संपूर्ण प्रवासी विमानाचं उत्पादन करण्यााचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 28, 2025 | 07:15 PM
India-Russia Deal: अमेरिकेला दणका! भारताचा रशियासोबत विमान निर्मीतीचा ऐतिहासिक करार
Follow Us
Close
Follow Us:
  • भारत रशियात विमाननिर्मिती करार
  • HAL आणि UAC यांच्यात सुखोई सुपरजेट SJ-100 या नागरी विमान निर्मिती करार
  • या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणे आणि देशांतर्गत विमान उत्पादनाला चालना देणे

India and Russia Deal: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिकेतील व्यापारी संबंध चांगलेच ताणले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जवळपास ५० टक्के आयात शुल्क लादलं आहे. इतकचं नव्हे तर, भारताच्या व्यापार आणि आंतरराष्ट्रीय धोरणांवर सातत्याने टीका करत आहेत. याचा भारताला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटकाही बसला आहे. त्यातच भारताने रशियाकडून तेल आयात करू नये, यासाठी ट्रम्प सतत दबावही टाकत आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

भारत आणि रशिया यांनी विमाननिर्मिती क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांच्यात सुखोई सुपरजेट SJ-100 या नागरी विमानाच्या संयुक्त निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला आहे.

Indian Army: भारताकडून मोठ्या यु्द्धाची तयारी सुरू; संरक्षण मंत्रालयाचे १० वर्ष पुरतील इतका दारु-गोळा तयार करण्याचे आदेश

या सामंजस्य करारानुसार दोन्ही देश नागरी विमान उद्योगातील सहकार्य वाढवणार आहेत. HAL आणि UAC यांच्या भागीदारीत तयार होणाऱ्या या प्रकल्पामुळे भारताला विमाननिर्मितीच्या क्षेत्रात स्वदेशी क्षमतांचा नवा टप्पा गाठता येणार आहे. या करारामुळे देशांतर्गत नागरी विमान वाहतूक क्षेत्रात मोठी क्रांती घडू शकते, तसेच “मेक इन इंडिया” उपक्रमाला देखील बळ मिळेल, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारत आणि रशियामध्ये विमाननिर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक सहकार्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाच्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) यांनी सुखोई सुपरजेट SJ-100 या नागरी प्रवासी विमानाच्या संयुक्त निर्मितीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

वृत्तानुसार, HAL आणि UAC यांच्या सहकार्यातून भारत आता SJ-100 नागरी विमानांचे उत्पादन सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रादेशिक हवाई संपर्क वाढवणे आणि देशांतर्गत विमान उत्पादनाला चालना देणे हे आहे.

Pakistan Airspace Close: भारताच्या ‘त्रिशूल’मुळे पाकिस्तानी सैन्याची वितभर फाटली; थेट हवाई हद्दच बंद केली

तज्ञांच्या मते, या उपक्रमामुळे भारतातील नागरी विमान वाहतूक उद्योगासाठी नवीन युगाची सुरूवात होईल. प्रादेशिक विमानांच्या वाढत्या मागणीची पूर्तता होईल तसेच देशातील तांत्रिक कौशल्य, रोजगार आणि गुंतवणुकीच्या संधींनाही चालना मिळेल. हा करार “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या उपक्रमांना बळ देणारा ठरेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आज राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या करारावर स्वाक्षरी केली आहे. या कराराच्या माध्यामातून भारताने पहिल्यांदाच संपूर्ण प्रवासी विमानाचं उत्पादन करण्यााचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासंबंधी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे प्रभात रंजन आणि ओलेग बोगोमोलोव्ह यांच्या उपस्थित या भारत आणि रशिया सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच! पाकिस्तानने केली नापाक कृती; सीजफायरचे उल्लंघन केले अन् थेट…

केंद्राच्या यूडीएएन योजनेअंतर्गत प्रादेशिक हवाई संपर्क वाढवण्यासाठी या निर्णयाला महत्त्वाची चाल मानली जात आहे. उद्योग तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, पुढील दशकात भारताला प्रादेशिक हवाई प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या श्रेणीतील किमान २०० जेट्सची गरज भासेल. तसेच, हिंद महासागर क्षेत्रातील जवळच्या आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थळांना सेवा देण्यासाठी सुमारे ३५० अतिरिक्त विमानांची आवश्यकता राहील. त्यामुळे हा करार भारताच्या विमानवाहतूक क्षेत्रासाठी एक निर्णायक आणि दूरगामी पाऊल ठरणार आहे.

Web Title: India russia deal a blow to america india signs historic agreement with russia to produce passenger aircraft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 07:15 PM

Topics:  

  • Donald Trump

संबंधित बातम्या

‘चापलूसी करण्यात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणतील शहबाज शरीफ…’, ट्रम्पच्या प्रशंसेचे बांधले पूल, पाकिस्तानच्या माजी राजदूताचा टोमणा
1

‘चापलूसी करण्यात ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणतील शहबाज शरीफ…’, ट्रम्पच्या प्रशंसेचे बांधले पूल, पाकिस्तानच्या माजी राजदूताचा टोमणा

India Russia oil imports: रुसवर लादलेल्या तेलबंदीने हाती येणार का? युद्धविराम होणार का शक्य?
2

India Russia oil imports: रुसवर लादलेल्या तेलबंदीने हाती येणार का? युद्धविराम होणार का शक्य?

ASEAN Summit 2025 :- डोनाल्ड ट्रम्प समोर भारताचा गौरव! फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांनी नरेंद्र मोदींना दिला जागतिक सन्मान
3

ASEAN Summit 2025 :- डोनाल्ड ट्रम्प समोर भारताचा गौरव! फिलिपिन्स राष्ट्राध्यक्षांनी नरेंद्र मोदींना दिला जागतिक सन्मान

India US Relations: ‘भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान, दुसऱ्या बाजूला Trump कडून पाकिस्तानी नेत्यांचे कौतुक
4

India US Relations: ‘भारताशी मैत्री ही…’ मार्को रुबियोचे स्पष्ट विधान, दुसऱ्या बाजूला Trump कडून पाकिस्तानी नेत्यांचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.