पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार (फोटो- सोशल मीडिया)
पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार
पाकिस्तानने पुन्हा एकदा केले सीजफायरचे उल्लंघन
लिपा घाटीत भारताच्या चौक्यांवर गोळीबार
Pakistan Violates Ceasefire: कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच! अशी म्हण म्हणतात ती उगाचच नाही. कारण आपला शेजारी असलेला आपला शत्रू पाकिस्तानला देखील हीच म्हण लागू होते. पाकिस्तान सतत भारताच्या कुरापती काढत असतो. दरम्यान पाकिस्तानने पुन्हा एकदा सीजफायरचे उल्लंघन केले आहे. भारतीय चौक्यांवर पाकिस्तानने गोळीबार सुरू केला आहे.
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे. सीजफायरचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृतीला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने रात्रीचा फायदा घेत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला आहे.
भारतीय लष्कराने देखील पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय लष्कराने चोख उत्तर देताना पाकिस्तानच्या ठिकाणांना लक्ष्य केले. यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. आम्ही कोणत्याही कृतीला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले.
पुण्यात एटीएसची मोठी कारवाई
पुण्यात गेल्या आठवड्यात दहशतवादी विरोधी पथकाकडून कोंडव्यामध्ये दहा ठिकाणी छापा टाकण्यात आला होता. या दहा ठिकाणी एटीएसच सर्च ऑपरेशन सुरू होत. त्यात टाकलेल्या छाप्यात एकाला अटक करण्यात आली आहे. पुणे दहशतवादी विरोधी पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. दहशतवाद्यांना मदत मदत केल्याच्या संशयावरून एटीएसने पुण्यात दहा ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यामध्ये अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने एकाला अटक करण्यात आली आहे. त्याला अटक करून आता त्याची चौकशी केली जात आहे.
Pune Crime: पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; कोंढव्यातून संशयित दहशतवाद्याला अटक
एटीएसने का राबवलं सर्च ऑपरेशन ?
पुण्यात करण्यात आलेली ही कारवाई 2023 मध्ये पुण्यात उघडकीस आलेल्या ISIS-संबंधित दहशतवादी कारवायाशी होती. ज्या प्रकरणात मुंबई, पुणे आणि गुजरातमधील काही भागांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला गेला होता. त्या आरोपाखाल अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली होती. तपासात धक्कादायक माहिती समोर आली होती ती म्हणजे आरोपींनी कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्ब चाचणी घेतली होती. त्यांच प्रशिक्षण कोंढवा परिसरात झालं होत. बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेवून घातपात करण्याचा त्यांचा डाव होता त्यातील एकाला आज पुणे एटीएसने अटक केली आहे.






