Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India vs Pakistan War: पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटला?

जम्मू काश्मीरमधील एलओसीवर पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने रात्रभर जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतानेही तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2025 | 08:49 AM
WAR (फोटो सौजन्य SOCIAL MEDIA )

WAR (फोटो सौजन्य SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीरमधील एलओसीवर पुन्हा एकदा युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने रात्रभर जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतानेही तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलं. पूंछ, राजौरी आणि सांबा सेक्टरमध्ये सुरू झालेल्या पाकिस्तानच्या भडकवणाऱ्या कृतीला भारतीय सैन्याने निर्णायक उत्तर दिलं असून, पाकिस्तानच्या चौक्या अक्षरशः राख झाल्या आहेत.

पाकिस्तानकडून हल्ले अन् भारताकडून चोख प्रत्युत्तर; आत्तापर्यंत ‘या’ महत्त्वपूर्ण घडल्या घडामोडी…

कराची बंदरावर भारतीय नौदलाचा धडाकेबाज हल्ला

भारताच्या नौदलाने पाकिस्तानच्या कराची बंदरावर 14 पेक्षा जास्त मोठे स्फोट घडवत हल्ला चढवला. या हल्ल्यांमुळे संपूर्ण बंदरक्षेत्र हादरून गेलं असून, मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पाकिस्तानला बंदर परिसरात ब्लॅकआऊट जाहीर करावा लागला. 1971 नंतर प्रथमच कराची बंदरावर अशा स्वरूपात भारतीय कारवाई झाली आहे. भारताच्या या प्रतिहल्ल्यामुळे पाकिस्तानातील 16 पेक्षा अधिक शहरांमध्ये हाहाकार माजला आहे. इस्लामाबाद, लाहोर, पेशावरसारख्या प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे. इस्लामाबादमध्ये पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ हल्ला झाला, ज्यामुळे त्यांना तत्काळ बंकरमध्ये हलवण्यात आलं.

पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि लढाऊ विमानांद्वारे हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र सर्व हल्ले निष्फळ ठरले. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची तीन लढाऊ विमानं पाडली. चीननं दिलेले पाकिस्तानचेदोन जेएफ-17 (JF-17) आणि एक एफ-16 (F-16). विशेष म्हणजे एफ-16 हे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळालेलं अत्याधुनिक विमान होतं. पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनीही ही धक्कादायक कबुली दिली आहे.

भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानमध्ये मोठा उठाव झाल्याचं समोर आलं आहे. बलुचिस्तान स्वातंत्र्याच्या दिशेने पावलं टाकताना, पाकिस्तानी लष्कराने आपले काही तळ आणि चौक्या सोडून पळ काढला. काही वरिष्ठ लष्कर अधिकाऱ्यांवर देशद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले आहेत.

तुर्कीचे कार्गो विमान कराचीत

या साऱ्या घडामोडींमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तुर्कीचे एक कार्गो विमान कराची विमानतळावर उतरल्याचं निदर्शनास आलं आहे. हे विमान ड्रोनसह लष्करी उपकरणे घेऊन आलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. जरी तुर्कीने मानवतावादी मदत असल्याचा दावा केला असला, तरी भारतविरोधी लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मदत पुरवल्याची खात्रीलायक माहिती आहे.

पाकिस्तान कुठे कुठे तोंडावर आपटलं?

  • भारतावर केलेले ड्रोन हल्ले पूर्णतः अपयशी
  • लढाऊ विमाने पाठवली, पण एकही यशस्वी नाही
  • भारताने पाडली चार लढाऊ विमाने
  • कराची पोर्ट उद्ध्वस्त
  • राजधानी इस्लामाबादेत हल्ले
  • पंतप्रधानाच्या घराजवळ हल्ले – बंकरमध्ये लपावं लागलं
  • लाहोरमधील हल्ल्यांनी लाज काढली
  • पाक सैन्यप्रमुखावर देशद्रोहाचा खटला
  • बलुचिस्तानने पाकिस्तानच्या 3 भागांवर कब्जा केला
  • बलुचिस्तानातील चौक्या सोडून पळून जाण्याची वेळ

इस्लामाबाद ते कराची हादरले! भारताच्या INS विक्रांतची धमाकेदार एन्ट्री, पाकची हवा टाइट

Web Title: India vs pakistan war where did pakistan get hit in the face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 08:49 AM

Topics:  

  • India vs Pakistan
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर
2

WCL 2025 : या एका खेळाडूच्या कृत्यामुळे भारताने WCL 2025 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळला नाही, मोठे सत्य आलं समोर

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल
4

लवकरच युद्ध होणार या भविष्यवाणीला नेमकं म्हणायचा का? अमेरिकेच्या दौऱ्यावर असीम मुनीरचे बडबड बोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.