
China Foregin Minister Wang Yi
दरम्यान दोन्ही देशांतील युद्धबंदीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मोठा दावा केला होता. त्यांच्यामुळेच भारत-पाक संघर्ष थांबल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु भारताने हा दावा स्पष्टपणे फेटाळला होता. परंतु आता चीन देखील पाकिस्तानचा पाठीराखा बनला आहे. चीनने देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी घडवून आणली असल्याचा दावा केला आहे.
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत-पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. मंगळवारी त्यांनी जागतिक मंचावर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा चीनने मध्यस्थी केलेल्या संवेदनशील मुद्यांपैकी होता असे म्हटले आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी खळबळ उडाली आहे.
बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनच्या परराष्ट्र संबंधावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहग यांनी, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतरप अनेक युद्धे आणि सीमापार संघर्ष सुरु झाल्याचे म्हटले. यामुळे सर्वत्र अशांतता पसरली होती, आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्यावर चीनने लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी सांगितले की, आम्ही उत्तर म्यानमार, इराणचा अणुप्रश्न, पाकिस्तान आणि भारत तणाव, पॅलेस्टाईन-इस्रायल आणि कंबोडिया-थायलंड संघर्षात मध्यस्थी केली आहे.
पहलगाम हल्ल्यासाठी (Pahalgam Attack) भारताने पाकिस्तानला जबाबदार धरले होते. भारताच्या मते, पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याने हे दहशतवादी हल्ले होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला धझडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. यामध्ये पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामुळे संतापून पाकिस्तानने देखील भारतावर हल्ले सुरु केले. पण भारताने प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले होते. दोन्ही देशात जवळपास चार दिवस संघर्ष सुरु होता.
दरम्यान भारताच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने हल्ल्यांना घाबरुन युद्धबंदीची विनंती केली होती. या विनंतीवरुन विनंतीवरुन दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी (DGMO) थेट चर्चा केवली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली. या युद्धबंदीमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा समावेश नसल्याचे भारताने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. भारताने ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या मध्यस्थीनेचा दावाही फेटाळला आहे. तसेच चीनचाही दावा भारताने फेटाळला आहे.
पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
Ans: चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. परंतु भारताने हा दावा फेटाळला
Ans: भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या लष्करी संचालन महासंचालकांनी (DGMO) थेट चर्चा केवली आणि युद्धबंदी लागू करण्यात आली.
Ans: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, त्यांनी दोन्ही देशाच्या प्रमुखांशी चर्चा केली. त्यांना युद्ध थांबवले नाहीतर जास्त टॅरिफची धमकी दिली. यामुळे दोन्ही देश युद्धबंदीसाठी तयार झाले.