पाकडे सुधारणार नाहीच! हरीयाणामधून पाकिस्तानच्या गुप्तहेराला अटक; 3 वर्षांपूर्वीच युवक...
हरियाणामध्ये पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
भारतीय सुरक्षा दलांची गुप्त माहिती पाकला दिल्याचा आरोप
Harayana Breaking: हरयाणामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. हरियाणाच्या पलवल भागातून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल हरयाणाच्या पलवलमधून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. या तरुणावर दिल्लीतील पाकिस्तानच्या दुतावासातील एका कर्मचाऱ्याला भारतीय सैन्याशी संबंधित माहिती दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याचा आरोप असलेल्या तरुण तीन वर्षांपूर्वीच पाकिस्तानमध्ये गेल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानला माहिती पुरवत असल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आरोपीकडून अनेक महत्वाच्या गोष्टी जप्त केल्या आहेट. त्याच्याकडे अनेक पाकिस्तानी नंबर मिळाल्याचे समोर आले आहे.
या गुप्तहेराकडून जवळपास 10 पेक्षा जास्त पाकिस्तानी नंबर मिळाले आहेत. त्याचे काही चॅटस देखील सापडले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आरोपी पाकिस्तानच्या लोकांशी संपर्क साधत असल्याचे समोर आले आहे.
बोटं छाटली आणि शेवटी गळा दाबून हत्या
अर्जेंटिना मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ड्रग्ज टोळीने तीन मुलींचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाहीतर या सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी पीडित मुलींना निर्दयीपणे मारहाण केली, नंतर त्यांची नखे उपटून टाकली आणि क्रूरपणे बोटं छाटली.
नेमकं काय घडलं?
अर्जेंटिना येथील एका ड्रग्जच्या टोळीने तीन मुलींचं अपहरण केले. त्यानंतर तिच्यासोबत अत्यंत क्रूर कृत्य केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी पीडित मुलींना निर्दयीपणे मारहाण केली, नंतर त्यांची नखे उपटून टाकली आणि क्रूरपणे बोटं छाटली. यानंतरही जेव्हा पीडित मुलींनी आरोपींच्या मागणीला नकार दिला तेव्हा त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. सोशल मीडियावर या हत्येचे थरार लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवण्यात आले. मृत्यू झालेल्या तिघींचे नाव लारा, ब्रेंडा, मोरेना असे असल्याचे समोर आले आहे.
ही घटना समोर येताच नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांसोबत संसदेकडे धाव घेतली. लोकांनी “लारा, ब्रेंडा, मोरेना” असे लिहिलेले बॅनर आणि त्यांचे फोटो असलेले पोस्टर सोबत घेऊन न्यायाची मागणी केली. ब्रेंडाचे वडील लिओनेल डेल कास्टिलो यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांच्या मुलीची प्रकृती इतकी वाईट होती की कुटुंबीय तिला ओळखू सुद्धा शकत नव्हते.