अर्जेंटिना मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ड्रग्ज टोळीने तीन मुलींचं अपहरण करून निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाहीतर या सोशल मीडियावर लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी पीडित मुलींना निर्दयीपणे मारहाण केली, नंतर त्यांची नखे उपटून टाकली आणि क्रूरपणे बोटं छाटली. ही घटना १९ सप्टेंबरला रात्री घडली.
Palghar Crime: पालघर हादरलं! नवरात्रीच्या उपवासात मुलाने केला चिकन लॉलीपॉपसाठी हट्ट; आईने केली हत्या
नेमकं काय घडलं?
अर्जेंटिना येथील एका ड्रग्जच्या टोळीने तीन मुलींचं अपहरण केले. त्यानंतर तिच्यासोबत अत्यंत क्रूर कृत्य केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांनी आधी पीडित मुलींना निर्दयीपणे मारहाण केली, नंतर त्यांची नखे उपटून टाकली आणि क्रूरपणे बोटं छाटली. यानंतरही जेव्हा पीडित मुलींनी आरोपींच्या मागणीला नकार दिला तेव्हा त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला. सोशल मीडियावर या हत्येचे थरार लाईव्ह स्ट्रीमिंग करत दाखवण्यात आले. मृत्यू झालेल्या तिघींचे नाव लारा, ब्रेंडा, मोरेना असे असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांमध्ये संताप
ही घटना समोर येताच नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पीडितांच्या कुटुंबियांसोबत संसदेकडे धाव घेतली. लोकांनी “लारा, ब्रेंडा, मोरेना” असे लिहिलेले बॅनर आणि त्यांचे फोटो असलेले पोस्टर सोबत घेऊन न्यायाची मागणी केली. ब्रेंडाचे वडील लिओनेल डेल कास्टिलो यांनी माध्यमांना सांगितलं की, त्यांच्या मुलीची प्रकृती इतकी वाईट होती की कुटुंबीय तिला ओळखू सुद्धा शकत नव्हते.
आतापर्यंत ५ जणांना अटक ?
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत तीन पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. बोलिव्हियाच्या सीमावर्ती शहरात व्हिलाझोन येथे एका संशयिताला अटक करण्यात आली; त्याच्यावर कारने लॉजिस्टिक सपोर्ट पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी 20 वर्षीय पेरू देशाचा नागरिक असलेला सूत्रधार अद्याप फरार असल्याची माहिती दिली. त्याचा फोटो प्रसिद्ध झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
पीडितांच्या कुटुंबियांनी काय दिली माहिती ?
स्थानिक माध्यमे आणि सुरुवातीच्या पोलिस अहवालांमध्ये वेश्या म्हणून काम करण्याच्या बहाण्याने तिन्ही मुलींना पार्टीमध्ये आणण्यात आले होतं, असं म्हटलं आहे. मात्र, लाराची मावशी, डेल व्हॅले गॅल्वन यांनी हे आरोप फेटाळून लावले आणि लाराचा ड्रग्ज किंवा वेश्याव्यवसायाशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, ब्रेंडा आणि मोरेनाचा चुलत भाऊ फेडेरिको सेलेबोनने कबूल केले की ते दोघेही कधीकधी पैसे कमवण्यासाठी देहव्यापार करत असत, परंतु कुटुंबियांना याची माहिती नव्हती.