श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत शूर जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार मारण्यात आलेले तीन दहशतवादी हे लष्कर ए तोयबाचे असल्याचे समजते आहे.
पहलगाम येथे 26 जणांची हत्या करणारे दहशतवादी अजून सापडलेले नाहीयेत. त्यांचा शोध लष्कराकडून सुरू आहे. भारतीय सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचे पोस्टर्स देखील जारी केले आहेत. दरम्यान ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले आहे. त्यानंतरआज ते अचानक आदमपूर एअरबेसवर जवानांची भेट घेण्यासाठी दाखल झाले होते.
शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
दक्षिण काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या तीन दहशतवाद्यांनी मोठे नुकसान करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देखील पाकिस्तान सुधारला नसल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी भारतात पाठवण्याचे सत्र अजूनही थांबलेले दिसत नाहीये. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क झाले आहे.