Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात अलास्कामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीबाबत भारताची भूमिका समोर आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 16, 2025 | 06:18 PM
Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
Follow Us
Close
Follow Us:

Trump-Putin Meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात अ‍लास्का (Alaska) येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीवर भारताने आपली प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी या भेटीचे स्वागत केले. “भारत अ‍लास्कामध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यात झालेल्या शिखर परिषदेचे स्वागत करतो. शांततेच्या दिशेने त्यांचे नेतृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे,” असे ते म्हणाले. जयस्वाल यांनी पुढे सांगितले की, “शिखर परिषदेतील प्रगतीचे भारत कौतुक करतो. पुढील मार्ग केवळ चर्चा आणि मुत्सद्देगिरीनेच मिळू शकतो. जगाला युक्रेनमधील संघर्ष लवकर संपलेला पाहायचा आहे.”

शांतता कराराची ट्रम्प यांची भूमिका

अ‍लास्कामध्ये पुतिन यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी सांगितले की, “युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे थेट शांतता करार करणे, केवळ शस्त्रसंधी करारावर थांबणे नाही.” ट्रम्प यांचे हे विधान अनेकांना आश्चर्यचकित करणारे आहे. कारण यापूर्वी ते आधी शस्त्रसंधी आणि नंतर शांतता कराराबद्दल बोलत होते. मात्र, आता त्यांनी थेट शांतता कराराला प्राधान्य दिले आहे. ट्रम्प यांच्या या भूमिकेने जगभरातील लोकांना धक्का बसला आहे.

MEA spokesperson Randhir Jaiswal says, “India welcomes the Summit meeting in Alaska between US President Donald Trump and President Vladimir Putin of Russia. Their leadership in the pursuit of peace is highly commendable. India appreciates the progress made in the Summit. The way… pic.twitter.com/2FXnyvzIrD

— ANI (@ANI) August 16, 2025

Trump-Putin Meeting : ‘ना युद्धबंदी ना कोणताही करार…’ ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील 3 तासांच्या बैठकीत नेमके काय घडले?

ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’वरील संदेश

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया साइटवर लिहिले, “अ‍लास्कामध्ये आजचा दिवस खूप यशस्वी राहिला! रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतची भेट खूप चांगली होती. याशिवाय, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की आणि युरोपमधील अनेक नेत्यांशी, ज्यात नाटोचे सरचिटणीसही सामील आहेत, यांच्याशी रात्री उशिरा फोनवर चर्चा झाली.” ट्रम्प पुढे म्हणाले, “आम्ही सर्वांनी मिळून हे ठरवले आहे की, रशिया आणि युक्रेनमधील भयानक युद्ध संपवण्याचा सर्वात चांगला मार्ग हा एक शांतता करार आहे, केवळ शस्त्रसंधी नाही, कारण ती अनेकदा अयशस्वी ठरते.”

कोण होते उपस्थित?

ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासह वरिष्ठ सल्लागार उपस्थित होते. एकेरी बैठकीऐवजी मोठ्या स्वरूपाची बैठक घेण्यात आली. पुतिन यांच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह सामील होते.

Viral : अमेरिकेला गंडवलं? खरे नाही तर ‘क्लोन पुतिन’ने घेतली ट्रम्पची भेट; सोशल मीडियावर धुमाकूळ

पुढची पायरी काय?

जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष आता पुढील काही महिन्यांतील घडामोडींवर आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील संवादाने युद्ध थांबण्याची आशा निर्माण केली असली तरी ठोस कराराशिवाय ती केवळ आशा राहते. तरीदेखील, या भेटीने संवादाचे दार उघडले हे मात्र नक्की

Web Title: Indias reaction to trump putins alaska meeting appreciates peace efforts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 06:18 PM

Topics:  

  • Donald Trump
  • india
  • Vladimir Putin

संबंधित बातम्या

Russia Ukraine War Update : डोनबास सोडा, नाटोपासून तटस्थ रहा; पुतिनच्या नवीन प्रस्तावाने बदलला युक्रेन युद्धाचा मार्ग
1

Russia Ukraine War Update : डोनबास सोडा, नाटोपासून तटस्थ रहा; पुतिनच्या नवीन प्रस्तावाने बदलला युक्रेन युद्धाचा मार्ग

Zelenskyy : झेलेन्स्की पुतिनसमोर झुकणार? युद्धबंदीपूर्वी ‘सुरक्षा हमी’ची अट, युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मोठे विधान
2

Zelenskyy : झेलेन्स्की पुतिनसमोर झुकणार? युद्धबंदीपूर्वी ‘सुरक्षा हमी’ची अट, युक्रेनच्या राष्ट्रपतींचे मोठे विधान

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार
3

India–Russia Relations : भारतीय अजूनही रशियन सैन्यात… जयशंकर यांची रशियाकडे ‘ही’ आग्रहपूर्ण मागणी, मॉस्को मदतीस तयार

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप
4

युद्ध विनाशाच्या अंतिम सीमेवर! युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला; रशियाच्या क्षेपणास्त्रांचा आकडा उडवेल झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.