Trump-Putin Meeting : 'ना युद्धबंदी ना कोणताही करार...' ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील ३ तासांच्या बैठकीत नेमके काय घडले? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Donald Trump Vladimir Putin Alaska Meeting : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जागतिक राजकारणातील दोन अत्यंत प्रभावशाली नेते शुक्रवारी अलास्कामध्ये समोरासमोर आले. युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी घेतलेल्या या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चेला दोन्ही बाजूंनी “फलदायी” आणि “परस्पर आदरयुक्त” असे म्हटले, मात्र ठोस तोडगा मात्र अजूनही हाती आलेला नाही.
अलास्कातील जॉइंट बेस एल्मेंडॉर्फ-रिचर्डसन या ऐतिहासिक लष्करी तळावर ही बैठक झाली. शीतयुद्धाच्या काळात जिथून सोव्हिएत युनियनवर बारीक लक्ष ठेवले जात असे, त्या ठिकाणीच ही अत्यंत महत्त्वाची परिषद घेण्यात आली. ट्रम्प-पुतिन यांच्यातील चर्चा मुख्यत्वे युक्रेन संकट, युरोपियन सुरक्षा आणि जागतिक व्यापार संतुलनावर केंद्रित होती.
बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली, पण पत्रकारांना प्रश्न विचारण्याची संधी देण्यात आली नाही. ट्रम्प यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “पूर्ण करार होईपर्यंत कोणताही करार होणार नाही.” पुतिन यांनी याला प्रतिसाद देताना चर्चेला “Deep and Useful” असे वर्णन केले.
The Alaska Press Conference ends with Trump calls Putin’s remarks deep, says he’ll reach out to Ukraine’s President & NATO, — Putin adding, “next time in Moscow.” No #Ceasefire, no deal, no multilateral talks, Now trump will increase tarrif to 75% ?#Alaska #AlaskaSummit pic.twitter.com/R1rcbCgdqq — Dr Vivek Pandey (@Vivekpandey21) August 16, 2025
credit : social media
ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्यासह वरिष्ठ सल्लागार उपस्थित होते. एकेरी बैठकीऐवजी मोठ्या स्वरूपाची बैठक घेण्यात आली. पुतिन यांच्या शिष्टमंडळात परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आणि धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह सामील होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Putin Meeting: ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये…’ पुतिन यांचे ट्रम्पला थेट निमंत्रण; युक्रेन युद्धावर गरमागरम चर्चा
ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे, फक्त काही गंभीर मुद्द्यांवर चर्चा पुढे सुरू राहील. पुतिन यांनी दीर्घ भाषण करून दोन्ही राष्ट्रांमधील परस्पर आदराचे महत्त्व अधोरेखित केले.
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना स्पष्ट आवाहन केले आहे. “रशियाने हल्ले थांबवले पाहिजेत, युद्ध संपवण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले. झेलेन्स्कींच्या अपेक्षा अमेरिकेकडून मोठ्या आहेत.
या बैठकीचा अप्रत्यक्ष परिणाम भारतावरही होऊ शकतो. रशियन तेल खरेदीवर अमेरिकेने लादलेले शुल्क, तसेच पश्चिमेकडून वाढणारा दबाव, भारतासमोर नवे आव्हान उभे करत आहेत. कोलंबिया विद्यापीठाचे प्राध्यापक जेफ्री सॅक्स यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “अमेरिका इतर देशांना आपल्या व्यापार युद्धात प्यादे बनवते. भारताने सावधगिरी बाळगली पाहिजे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य
जगभरातील तज्ज्ञांचे लक्ष आता पुढील काही महिन्यांतील घडामोडींवर आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील संवादाने युद्ध थांबण्याची आशा निर्माण केली असली तरी ठोस कराराशिवाय ती केवळ आशा राहते. तरीदेखील, या भेटीने संवादाचे दार उघडले हे मात्र नक्की.