इंडिगोच्या दिल्ली-श्रीनगर विमानाच्या पुढच्या भागाचं हवेतच मोठं नुकसान; विमानात 227 प्रवासी
दिल्लीहून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइट क्र 6E2142 मधील प्रवाशांशी आज अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. मंगळवारी दिल्लीहून उड्डाण भरलेल्या विमानाला प्रचंड खराब हवामानाचा सामना करावा लागला. यात विमानाच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं. मात्र विमानाचं श्रीनगरमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग केल्यामुळे विमानातील सर्व 227 प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित विमानतळवर उतरले. मात्र या घटनेमुळे प्रवासी हादरून गेले आहेत.
Priyanka Gandhi : देशभक्तीचा खरा अर्थ कोणी शिकवला? प्रियांका गांधींची ती भावनिक पोस्ट चर्चेत
इंडिगोच्या फ्लाइट क्र 6E2142 ने आज दिल्लीहून श्रीनगरकडे २२७ प्रवाशांना घेऊन उड्डाण भरलं होतं. मात्र अचानक फ्लाइटला खराब हवामान आणि गारांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विमानावर मोठ्या गारा पडताना दिसत आहेत, तर कॅबिनमधील वस्तू हलताना, प्रवासी घाबरलेले दिसत आहेत. अनेक प्रवासी ओरडताना व रडताना दिसत असून भीतीचे वातावरण होतं.
एका प्रवाशाने स्थानिक वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, “मी श्रीनगरहून घरी परत येत होतो. हा अनुभव मृत्यूच्या दाढेतून परत आल्यासारखा आहे. विमानाच्या पुढच्या भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.विमानाची स्थिती पाहून इंडिगोने फ्लाइटला “एअरक्राफ्ट ऑन ग्राउंड” (AOG) घोषित केले आहे. विमान मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे त्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी विमानात असलेले सर्वांना धक्का बसला आहे.
म्हाडाकडून दादरमधील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर, रहिवाशांना खोली खाली करण्याच्या बजावल्या नोटीस
दरम्यान, इंडिगोकडून दिल्ली, कोलकाता आणि चंदीगडसाठी हवामानविषयक अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. या शहरांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळामुळे उड्डाणे उशिराने किंवा रद्द होत आहेत. इंडिगोने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी आपली फ्लाइट स्टेटस तपासण्याचा सल्ला दिला आहे.