म्हाडाकडून दादरमधील अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर
मुंबई महापालिकेच्या अंर्तगत येणाऱ्या पुढील इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत
९४) धोकादायक इमारत क्र. ३७ – गुरुकृपा, उपक्रम क्र. फ द-७५८ [१], डॉ. एस. एस. वाघ मार्ग, दादर, मुंबई – ४०००१२
९५) धोकादायक इमारत क्र. २७४-२७४ ए – मिनवां बिल्डिंग, उपक्रम क्र. फ ८-८२५ [१ ए], माधवदास पास्ता रोड, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१२
९६) धोकादायक इमारत क्र. १८४-१८४ एफ – मिनर्वा मेन्शन, उपक्रम क्र. फ द-८२५ [१], डॉ. बी. ए. रोड, दादर (पूर्व), मुंबई – ४०००१२
या अतिधोकादायक इमारतींमध्ये एकूण ३१६२ भाडेकरू/रहिवासी वास्तव्यास आहेत. त्यामध्ये २५७७ निवासी आणि ५८५ अनिवासी भाडेकरू यांचा समावेश आहे. मंडळातर्फे आतापर्यंत १८४ निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्यासंबंधी नोटीस बजावण्यात आली आहे. त्या नोटीसनंतर केवळ ३ निवासी भाडेकरू/रहिवासी संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले असून, उर्वरित १७६ गाळे अजूनही रिक्त करण्यात आलेले नाहीत.
विशेष म्हणजे, नोटीस देऊनही या गाळ्यांतील कुणीही गाळेधारक/रहिवासी व्यक्ती स्वखर्चाने स्वतःची पर्यायी निवार्याची व्यवस्था केलेली नाही. अशा परिस्थितीत, उर्वरित इमारतींतील भाडेकरूंनाही निष्कासनाच्या सूचना देण्यात आल्या असून, इमारती रिक्त करण्याची कार्यवाही जोरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळाने निर्णय घेतला आहे की, २५७७ निवासी भाडेकरूंना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येईल. यासंबंधी नियोजन व कार्यवाही देखील मंडळातर्फे सुरू आहे.
Shivsena Politics: आता राजीनामा द्या नाहीतर….;भुजबळांच्या शपथविधीवरून राऊतांचा शिंदेंना खुले आव्हान
सर्व भाडेकरू/रहिवाशांना मंडळाकडून विनंती करण्यात येते की, त्यांनी आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंडळाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. गाळे वेळेत रिक्त करून अपघाताची शक्यता टाळावी. कोणतीही धोक्याची लक्षणे, भेगा, भिंती पडणे, गळती यासारख्या बाबी आढळल्यास तात्काळ मंडळाच्या नियंत्रण कक्षास सूचित करावे.
नियंत्रण कक्ष २४x७ कार्यरत असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सतत कार्यरत आहे. आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी मंडळाच्या सूचना न चुकता पाळाव्यात, ही नम्र विनंती आहे. असे आवाहन म्हाडाने केले आहे.