
IndiGo flight cancellations 2025: देशभरातील इंडिगो एअरलाईन्सच्या बिघडलेल्या वेळापत्रकामुळे देशातील हवाई प्रवासावर मोठा परिणाम झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पण याचा फायदा इतर विमान कंपन्यांना होत असल्याचेही दिसून येत आहे. इंडिगो (Indigo) विमानसेवा ठप्प झाल्याने इतर विमान कंपन्यांनी मात्र त्यांच्या तिकीटदरात मोठी वाढ केली आहे. अनेक लोकप्रिय मार्गांवरील विमानाच्या तिकीटांच्या किमती चांगल्याच वाढल्या आहेत. उसळी दिसत असून एअर इंडियाच्या पुणे–मुंबई उड्डाणाचे तिकीटदर तब्बल एक लाख रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच नागपूर–मुंबई मार्गावरील विमानाचे भाडेही 30 हजार रुपयांहून अधिक आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून इंडिगोचे वेळापत्रक विस्कळीत होत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका पुणे विमानतळाला बसला आहे. शुक्रवारी इंडिगोची तब्बल 46 उड्डाणे रद्द करण्यात आली. यात दिल्ली, नागपूर, चेन्नई, कोची, बंगळुरू, रांची या शहरांसह महाराष्ट्रातील 23 उड्डाणांचा समावेश होता. बाहेरील राज्यांतून पुणे येणारी 23 उड्डाणे देखील रद्द करण्यात आली. काही उड्डाणांच्या वेळेत दिवसभरात अनेकदा बदल करण्यात आल्याने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. वेळापत्रक बदल आणि उड्डाण रद्दीकरणामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली असून, तिकीटदर वाढल्याने प्रवास खर्चात मोठी भर पडत आहे.
‘…फिर से Sorry…’, रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युलवर IndiGo ची मो
शुक्रवारी इंडिगोने देशभरातील जवळपास 500 उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली, त्यानंतर सलग चौथ्या दिवशी विमानतळांवर गोंधळाचे वातावरण कायम राहिले. दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी उड्डाण करणारी सर्व देशांतर्गत विमाने मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्याचे दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने ‘एक्स’वर जाहीर केले. हजारो प्रवाशांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून अनेकांना विमानतळावरच थांबावे लागले. चार दिवसांत 1000 हून अधिक फ्लाईट रद्द झाल्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. (IndiGo)
गुरुवारी रात्री मुंबई–नागपूर इंडिगो उड्डाण अचानक रद्द झाल्याने अनेक व्हीआयपी प्रवाशांना रात्रीभर मुंबई विमानतळावरच थांबावे लागले. तिकीट दरात झालेल्या अचानक वाढीमुळे सामान्य प्रवाशांवर आर्थिक ताण वाढला आहे. विमान कंपन्यांतील समन्वय अभाव, तांत्रिक त्रुटी आणि कर्मचारी उपलब्धतेतील अडचणीमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा हवाई प्रवासावर गंभीर परिणाम होत आहे.
DGCA चा FDTL नवीन नियम सर्वांना लागू, मग Indigo वर सर्वाधिक परिणाम का? जाणून घ्या कारण
इंडिगोच्या सेवा खंडित झाल्याचा फटका कर्नाटकातील एका नवविवाहित जोडप्यालाही बसला. बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेले मेघा क्षीरसागर आणि संगम दास या दोघांचेही २३ नोव्हेंबरला लग्नझाले, मेधाच्या गावी ४ डिसेंबरला रिसेप्शन होते. त्यासाठी त्यांनी ३डिसेंरची विमानाची तिकीटेही बुक करूनठेवली होती. पण इंडिगोची सेवा कोलमडल्याने दोघेही हुबळीला जाऊ शकले नाहीत. या सगळ्या सावळ्या गोंधळामुळे त्या स्वतःच्याच रिसेप्शनला ऑनलाइन उपस्थित राहण्याची वेळ आली.
इंडिगो एअरलाईन्सचे वेळापत्रक विस्कळीत राहिल्यामुळे देशातील विविध विमानतळांवर आजही उड्डाण रद्द करण्याचा सिलसिला सुरूच आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणे रद्द झाल्याने प्रवाशांना पर्यायी व्यवस्था शोधण्याचे संकट निर्माण झाले आहे.
पुणे विमानतळावर इंडिगोची तब्बल 42 उड्डाणे रद्द झाली आहेत.
श्रीनगरहून उड्डाणाऱ्या 18 विमानांचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे.
वाराणसीत इंडिगोच्या 22 उड्डाणांवर घातली गंडांतर असून प्रवाशांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
चंदिगडमध्ये इंडिगोची 10 विमानांची उड्डाणे रद्द झाल्याचे समोर आले आहे.
अहमदाबादमध्ये सकाळपासून 19 उड्डाणे रद्द करण्यात आली असून विमानतळावर गर्दीचे वातावरण आहे.