Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madras High Court: संमतीने होणाऱ्या संबंधांत केवळ …! मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

सरकारी वकिलांच्या मते, मार्च २०१८ मध्ये घटनेच्या वेळी पीडिता अंदाजे १६ वषांची होती, ती महेशला (आरोपी) ओळखत होती, जो तिच्या मोठ्या भावाचा मित्र होता. महेशने तिला फोनवरून लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 07, 2026 | 01:51 PM
Madras High Court: संमतीने होणाऱ्या संबंधांत केवळ …! मद्रास उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
Follow Us
Close
Follow Us:
  • लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो कायदा) एक महत्त्वाचे निरीक्षण
  • पालकांच्या दबावाखाली, मुलीला दुसऱ्याशी लग्न करण्यास भाग पाडले जाऊ शकते
  • पोक्सो कायदा लागू करण्यासाठी, पीडितेचे वय सिद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे
 

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने अलीकडेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (पोक्सो कायदा) एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले आहे की जेव्हा किशोरवयीन मुला-मुलींमध्ये संमतीने होणारे लैंगिक संबंध गुन्हेगार ठरवले जातात तेव्हा बहुतेकदा मुलांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.

न्यायाधीश एन. माला यांनी पोक्सो प्रकरणात दोषी ठरलेल्या तरुणाची शिक्षा रद्द करताना हे निरीक्षण नोंदवले. किशोरवयीन मुलांमधील संमतीने होणाऱ्या लैंगिक संबंधांच्या प्रकरणांमध्ये पालकांच्या विरोधामुळे असे खटले अनेकदा दाखल होतात असे त्यांनी नमूद केले, पालकांच्या दबावाखाली, मुलीला दुसऱ्याशी लग्न करण्यास भाग पाडले जाऊ शकते, त्यानंतर पोक्सो कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध फौजदारी कारवाई सुरू केली जाते आणि त्याला दीर्घ तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागते. महेश नावाच्या तरुणाने दाखल केलेल्या फौजदारी अपीलावर हा निकाल देण्यात आला. ट्रायल कोर्टाने महेशला पोक्सो गुन्ह्यासाठी २० वर्षे सक्तमजुरी आणि अपहरणासाठी ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकाच वेळी लागू होणार होत्या.

Keshav Prasad Maurya: केशव प्रसाद मौर्य यांचे हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये आपत्कालीन लँडिंग

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सरकारी वकिलांच्या मते, मार्च २०१८ मध्ये घटनेच्या वेळी पीडिता अंदाजे १६ वषांची होती, ती महेशला (आरोपी) ओळखत होती, जो तिच्या मोठ्या भावाचा मित्र होता. महेशने तिला फोनवरून लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मुलीने त्याला सांगितले की तिचे पालक तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी लावून देत आहेत. ४ मार्च २०१८ रोजी मुलगी घर सोडून महेशसोबत गेली. दोघेही महेशव्या काकाच्या घरी गेले आणि तिथे लग्न केले. जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या अधिका-यानी त्यांना अटक कारून नागरकोइल महिला पोलिस स्टेशनला सोपवले. मुलीच्या तक्रारीच्या आधारे, पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला.

पुराव्यांमध्ये गंभीर त्रुटी

पोक्सो कायदा लागू करण्यासाठी, पीडितेचे वय सिद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मूळ कागदपत्रे उपलब्ध असतानाही पोलिसांनी मुलीचे वय सिद्ध करण्यासाठी तिच्या जन्म प्रमाणपत्राच्या आणि हस्तांतरण प्रमाणपत्राच्या फक्त छायाप्रती सादर केल्या होत्या. उच्च न्यायालयाने आरोपीला त्याचे वय सिद्ध करण्यात अक्षमतेमुळे सर्व आरोपांमधून निदर्दोष मुक्त केले आणि तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले.

भारताला या युद्धाची मोठी किंमत चुकवावी लागणार; Iran-Israel संघर्षावर राहुल गांधींची प्रतिक्रिया

सरकारला सूचना

हा मुद्दा गांभीर्याने घेत, उच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना पोक्सो कायद्याच्या कलम ४३ ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, जे कायद्याची जनजागृती अनिवार्य करते. या संदर्भात उचललेल्या पावलांचा स्थिती अहवाल ३ जून २०२६ पर्यंत सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

 

 

Web Title: Only children suffer serious consequences in consensual relationships important observation of the madras high court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Madras High Court
  • national news
  • POCSO

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
1

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.