Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 31 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Omar Abdullah Marriage: घटस्फोटानंतर तीन महिन्यांनी उमर अब्दुल्ला यांनी थाटला संसार; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

Omar Abdullah Marriage: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केल्याची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. दोघांचे फोटो शेअर करत त्यांनी नव्या प्रवासाची सुरुवात झाल्याचे म्हटले. पायल अब्दुल्ला यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर तीन महिन्यांनी ही घोषणा करण्यात आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 31, 2026 | 06:16 PM
घटस्फोटानंतर तीन महिन्यांनी ओमर अब्दुल्ला यांनी थाटला संसार; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

घटस्फोटानंतर तीन महिन्यांनी ओमर अब्दुल्ला यांनी थाटला संसार; पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह

Follow Us
Follow Us:
  • जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला विवाहबंधनात
  • पत्रकार निधी राजदान यांच्याशी केला विवाह
  • निधी राजदान यांच्यासोबत लग्नाची सोशल मीडियावर घोषणा
Omar Abdullah Marriage: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी ज्येष्ठ पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी उमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निधी राजदान यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करत आपल्या नव्या आयुष्याची घोषणा केली. ‘कालपासून एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली’, असे कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिले आहे. निधी राजदान यांनाही त्यांनी या पोस्टमध्ये टॅग केले. निधी राजदान यांनीही हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. त्यांच्या पोस्टलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पायल अब्दुल्ला यांच्याशी जुलैमध्ये झाला होता घटस्फोट

उमर अब्दुल्ला यांच्या आयुष्यातील या नव्या पर्वाची चर्चा त्यांच्या पहिल्या विवाहाच्या पार्श्वभूमीवरही होत आहे. ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचा विवाह १९९४ मध्ये झाला होता. या दाम्पत्याला जाहिर आणि जमीर अशी दोन मुले आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून वेगळे राहत होते.

La Nina Effect: आता हे काय नवीन! तुफान पाऊस, वादळी वाऱ्यांची शक्यता; एल निनोनंतर ला निनाचे संकट

या विवाहसंबंधातील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. ३१ जुलै २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १४२ अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करून ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचा विवाह परस्पर संमतीने संपुष्टात आणला. दोन्ही बाजूंनी आपापसातील मतभेद मिटवून प्रलंबित खटले मागे घेण्यास सहमती दर्शवली होती.

A new journey began yesterday 💍@Nidhi https://t.co/BXbdLq2d1H — Omar Abdullah (@OmarAbdullah) October 31, 2026

पत्रकारितेतील ओळख असलेल्या निधी राजदान यांच्यासोबत नवा प्रवास

निधी राजदान या देशातील परिचित पत्रकार आणि वृत्तनिवेदिका आहेत. त्यांनी अनेक वर्षे एनडीटीव्हीमध्ये काम केले असून राष्ट्रीय राजकारण आणि चालू घडामोडींवरील वृत्तांकनासाठी त्या ओळखल्या जातात. आता ओमर अब्दुल्ला यांच्यासोबतच्या विवाहामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर त्यांचे समर्थक, राजकीय नेते आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या आयुष्यातील या नव्या सुरुवातीची सध्या राजकीय आणि माध्यमविश्वात चर्चा रंगली आहे.

AAP Candidate List: AAP चा निवडणुकीसाठी मोठा निर्णय! पहिल्या उमेदवार यादीत कोणाला संधी? 40 उमेदवारांची यादी जाहीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कोणाशी विवाह केला आहे?

    Ans: ओमर अब्दुल्ला यांनी पत्रकार निधी राजदान यांच्याशी विवाह केला आहे.

  • Que: ओमर अब्दुल्ला यांनी विवाहाची घोषणा कधी केली?

    Ans: ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर निधी राजदान यांच्यासोबतचे फोटो शेअर करत विवाहाची घोषणा केली.

  • Que: ओमर अब्दुल्ला यांचा पायल अब्दुल्ला यांच्याशी घटस्फोट कधी झाला?

    Ans: ३१ जुलै २०२६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने परस्पर संमतीने ओमर अब्दुल्ला आणि पायल अब्दुल्ला यांचा विवाह संपुष्टात आणला.

Web Title: Jammu kashmir cm omar abdullah marries journalist nidhi razdan sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • Omar Abdullah
  • political news
  • Social Media

संबंधित बातम्या

Viral Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, मध्येच आली रिक्षा अन्… पुढे घडले भयानक, VIDEO पाहून थरकाप उडेल
1

Viral Video: भररस्त्यात दोन बैलांची झुंज, मध्येच आली रिक्षा अन्… पुढे घडले भयानक, VIDEO पाहून थरकाप उडेल

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क
2

Jagannath Temple Video: चक्रीवादळाचा जोरदार तडाखा, पण जगन्नाथ मंदिराचा ध्वज जागेवरच! व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

Orry Halloween Look: ना भूत, ना व्हॅम्पायर… हॅलोविनसाठी ओरीने धारण केला ‘तुंबाड’मधील हस्तरचा अवतार; भयावह लूकची चर्चा
3

Orry Halloween Look: ना भूत, ना व्हॅम्पायर… हॅलोविनसाठी ओरीने धारण केला ‘तुंबाड’मधील हस्तरचा अवतार; भयावह लूकची चर्चा

विधान परिषद निवडणुकीत पवारांची दिसून आली ‘पॉवर’; पक्षाचा स्ट्राईक रेट 100 टक्के
4

विधान परिषद निवडणुकीत पवारांची दिसून आली ‘पॉवर’; पक्षाचा स्ट्राईक रेट 100 टक्के

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.