AAP चा निवडणुकीसाठी मोठा निर्णय! पहिल्या उमेदवार यादीत कोणाला संधी? 40 उमेदवारांची यादी जाहीर
AAP Candidate List: आम आदमी पक्षाने 2027 (AAP)च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections 2027) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ४० उमेदवारांचा समावेश आहे. मुख्यमंत्री भगवंत मान धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ‘आप’ने सर्व ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.(AAP Candidate List)
मुख्यमंत्री भगवंत मान पुन्हा एकदा धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांची जागा बदलण्याबाबत चर्चा सुरू होती, परंतु पक्षाने त्यांना धुरीमधूनच उमेदवारी दिली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भगवंत मान यांनी काँग्रेसचे उमेदवार दलबीर सिंग गोल्डी यांचा ५८,२०६ मतांच्या फरकाने पराभव करून धुरी मतदारसंघ जिंकला होता. आता पक्षाने त्यांना आगामी निवडणुकीसाठी त्याच जागेवरून तिकीट दिले आहे.
संमतीने झालेले शारीरिक संबंध ब्रेकअपनंतर बलात्कार मानता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
‘आप’च्या पहिल्या यादीत तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा यांच्या नावाचाही समावेश आहे. पक्षाने त्यांना लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ते या जागेवरून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. कुलदीप सिंग धालीवाल यांना अजनाला मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तरनतारनमधून हरमीत सिंग संधू आणि एसएएस नगरमधून कुलवंत सिंग यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
आम आदमी पक्षाने आपल्या पहिल्या यादीत सर्व ४० विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. या ४० नावांच्या यादीत पक्षाने आपल्या विद्यमान आमदारांवर विश्वास व्यक्त केला आहे. पंजाब विधानसभेत एकूण ११७ जागा आहेत. राज्यात २०२७ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात सध्या आम आदमी पक्ष सत्तेत असून आगामी निवडणुकीत पुन्हा सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माहिती दिली की, पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीची (पीएसी) आज बैठक झाली. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तिकिटांवर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, ज्या उमेदवारांना जनमत चाचणीत चांगला पाठिंबा मिळाला आहे, त्यांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे. एकूण ४० उमेदवारांची तिकिटे निश्चित झाली आहेत. भगवंत मान यांनी सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले आणि ते पुन्हा एकदा निवडणुका जिंकतील अशी आशा व्यक्त केली.
Ans: आम आदमी पार्टीने पंजाब विधानसभा निवडणूक २०२७ साठी पहिल्या यादीत ४० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
Ans: मुख्यमंत्री भगवंत मान हे धुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
Ans: कुलतार सिंह संधवान यांना कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे?






