
JDU MLA Vibha Devi could not take oath at Bihar swearing-in ceremony video viral
नवादा जेडीयूचे आमदार आणि शक्तिशाली नेते राजवल्लभ यादव यांच्या पत्नी विभा देवी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शपथ घेताना आमदार विभा देवी यांना शपथपत्र वाचता देखील आले नाही. शपथ घेताना वारंवार अडखळत होत्या. त्यांना शब्द नीट उच्चारता येत नव्हते. त्या अनेक वेळा थांबल्या आणि शेवटी, जवळ बसलेल्या आमदार मनोरमा देवी यांच्या मदतीने त्यांनी ही अडथळ्यांची शर्यत पार केली. कसेतरी तुटक्या शब्दात शपथ पूर्ण करण्यात यशस्वी झाल्या. त्यांच्या या पद्धतीची सभागृहात बराच वेळ चर्चा झाली. सोशळ मीडियावर देखील विभा देवी यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा : भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी
विधानसभेत काय घडले?
खरं तर, जेव्हा विभा देवींची शपथ घेण्याची वेळआली तेव्हा त्या घाबरलेल्या दिसत होत्या. हातात शपथपत्र धरून त्या म्हणाल्या, “मी, विभा देवी, विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली आहे… मी निवडून आली आहे. मी देवाला प्रार्थना करते… मी ते कायद्याने स्थापित करते…” या गडबडीनंतर त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी शपथ घेताना गोंधळ उडाल्यानंतर आमदार मनोरमा यांना मदत मागितली.
बधाई हो बिहार— ये हैं नवादा की विधायक विभा देवी.. ठीक से, शपथ नहीं पढ़ पायी। बगल में बैठी अपनी साथी विधायक मनोरमा देवी से कहीं, पढ़ न छुटकी। बता ना । अपनी छुटकी के सपोर्ट से ठेढ़ा-बोकला शपथ पूरा किया! आपको बाहुबल,परिवारवाद,भौकाल चाहिए तो लीजिए। pic.twitter.com/bezGFm64KY — Ahmad Raza (@ahmadrazarjd) December 1, 2025
त्यानंतर मनोरमा देवी यांनी विभा देवी यांच्याशी दोन मिनिट बोललल्या. मात्र त्यानंतर देखील आमदार विभा देवींनी थरथरत्या आवाजात आणि चुकीच्या उच्चारात शपथ पूर्ण केली. बिहार विधानसभेतील या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी निवडणून आलेल्या आमदारांना साधी शपथ वाचता आली नाही अशी टीका केली.
उपमुख्यमंत्री रेणू देवी चूक केली
यानंतर, बेतिया येथून निवडून आलेल्या भाजप आमदार आणि बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री रेणू देवी यांनी चुकीची शपथ वाचली. प्रो-टेम स्पीकरने त्यांना लगेचच अडवले आणि त्यांना पुन्हा योग्यरित्या शपथ देण्यास भाग पाडले.
हे देखील वाचा: एकनाथ शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार? राजकीय दाव्यावर ॲक्शनमधून दिलं उत्तर
विभा देवी कोण आहेत?
विभा देवी या आरजेडीचे माजी आमदार आणि बलाढ्य नेते राजवल्लभ यादव यांच्या पत्नी आहेत. २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी नवादा मतदारसंघातून ८७,४२३ मतांनी विजय मिळवला. २४३ विधानसभा मतदारसंघांपैकी नवादा हा एक महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. ऑक्टोबरमध्ये नितीश कुमार यादव यांच्यासोबत सामील झाले. राजवल्लभ यादव यांना अलिकडेच पोक्सो प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले, ज्याचा नवादा राजकारणावर खोलवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.