Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“……तर मी कॉंग्रेस पक्ष सोडण्यास तयार”; कमलनाथ यांनी केली स्पष्ट भूमिका, वाचा सविस्तर

मध्यप्रदेशचा मुख्यमंत्री चेहरा असलेले कमलनाथ हे सध्या भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. दरम्यान, छिंदवाडामधील हर्रई येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत कमलनाथ यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Feb 29, 2024 | 02:51 PM
“……तर मी कॉंग्रेस पक्ष सोडण्यास तयार”; कमलनाथ यांनी केली स्पष्ट भूमिका, वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:
Kamal Nath Clear Stand : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टीत सामील होतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे.
कमलनाथ कुठेही जात नसल्याचं स्पष्ट
दरम्यान, काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन कमलनाथ कुठेही जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी कमलनाथ यांनीदेखील माझ्याबद्दल अफवा पसरवू नका असं म्हणत प्रसारमाध्यमांना सज्जड दम दिला. त्यापाठोपाठ आता कमलनाथ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
माझ्या कार्यकर्त्यांसाठी काम करत राहीन
कमलनाथ बुधवारी छिंदवाडा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, मी स्वतःला तुमच्यावर लादणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर मी पक्ष सोडण्यास तयार आहे. मला गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांकडून खूप प्रेम आणि विश्वास मिळला आहे. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी काम करत राहीन.
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभाग
कमलनाथ हे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडामधील हर्रई येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी कमलनाथ कार्यकर्ते आणि समर्थकांना उद्देशून म्हणाले, तुम्ही जर मला निरोप देणार असेल तर ही तुमची मर्जी असेल. मी जाण्यासाठी तयार आहे. मी स्वतःला तुमच्यावर लादणार नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं आहे.
छिंदवाडामध्ये काँग्रेसची मोर्चेबांधणी
कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ हे छिंदवाडाचे खासदार आहेत. नकुलनाथ यंदा पुन्हा एकदा छिंदवाडामधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कमलनाथ काँग्रेस आणि त्यांच्या मुलाच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. तसेच या मतदारसंघात काँग्रेसची मोर्चेबांधणी करत आहेत.
कमलनाथ यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना म्हणाले, आपले विरोधक म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे लोक खूप आक्रमक होऊन देशभर प्रचार करत आहेत. परंतु, तुम्ही त्यांना घाबरू नका. आपणही तितकीच मेहनत करू. आपल्याला लोकांचं भविष्य सुधारण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी एकेक मत सुनिश्चित करावं लागेल. आपण हे सगळं करू शकतो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.

Web Title: Kamal nath made a clear stand on congress party they said i am ready to leave the congress party read the exact reason nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 02:49 PM

Topics:  

  • Congress
  • Congress Party

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
2

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
3

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
4

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.