Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज

Praniti Shinde on BJP : प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारला धारेवर धरलं आहे. डेटा सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याचा दावा करत त्यांनी सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला. त्याचबरोबर डायलिसिस सेंटर बंद होण्याचा मुद्दा, SIR प्रक्रिया आणि सत्ताधाऱ्यांच्या मोर्चावरूनही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 09:34 PM
Praniti Shinde

Praniti Shinde

Follow Us
Follow Us:
  • भाजपच्या मोर्चावर प्रणिती शिंदेंचा निशाणा
  • मतचोरीच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला आव्हान
  • बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं दिलं चॅलेंज
 

सोलापूर : देशभरात विविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे काँग्रेसकडून सत्ताधाऱ्यांविरोधात तसेच निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपकडूनही काँग्रेससह विरोधकांवर अराजकता पसरवण्याचा आरोप करण्यात येत आहे. अश्यातच खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील विविध प्रश्नांवरून भाजप आणि सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

प्रणिती शिंदे यांनी आज (मंगळवार, 3 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपला थेट आव्हान देत ‘हिंमत असेल तर राजीनामा घेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,’ असं वक्तव्य केलं आहे.

यासह, सोलापुरात होणाऱ्या AI डेटा सेंटर प्रकल्पाला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला. तसंच, सोलापूरमधील आरोग्य सुविधांवरदेखील भाष्य करत रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला. (Praniti Shinde on BJP)

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त

AI डेटा सेंटरवरून प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

सोलापुरात प्रस्तावित AI डेटा सेंटर प्रकल्पावर बोलताना प्रणिती शिंदे यांनी पाण्याच्या उपलब्धतेचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागणार असल्याचा दावा करताना, आधीच सोलापूरकरांना सहा दिवसाआड पाणी मिळतंय, मग या प्रकल्पानंतर परिस्थिती काय असेल, असा सवाल त्यांनी केला.

उजनी परिसरातील जैवविविधतेवरही या प्रकल्पाचा परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. प्रकल्पातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळेलच याची खात्री नाही, असंही त्या म्हणाल्या. या प्रकल्पाच्या स्वरूपाबाबत आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

डायलिसिस सेंटर बंद, आरोग्य व्यवस्थेवरून सरकारला घेरलं

सोलापूरमधील आरोग्य सुविधांवर बोलताना १ नोव्हेंबरपासून महालॅब आणि डायलिसिस सेंटर बंद झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. सरकारकडे एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक देणी असल्याचं सांगत त्यांनी रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला.

भाजपच्या मोर्चावरून जोरदार टीका

‘संविधान वाचवा, अराजकतेविरोधात या’ या घोषणेखाली सत्ताधारी मोर्चा काढत असल्यावरूनही त्यांनी टोला लगावला. तरुण विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारेच आता लोकशाही वाचवण्याच्या गोष्टी करत असल्याची टीका त्यांनी केली. मोर्चासाठी लोकांना आणण्याचं टार्गेट दिलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला आव्हान

SIR प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत प्रणिती शिंदे यांनी ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. हिंमत असेल तर राजीनामा घेऊन बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, असं आव्हान त्यांनी दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्यासोबत खुली चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, AI डेटा सेंटरच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी एकत्रितपणे भूमिका मांडणार असल्याचं प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सोलापुरातील या प्रकल्पावरून आगामी काळात राजकीय संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

💡

Frequently Asked Questions

  • Que: SIR प्रक्रियेवरून प्रणिती शिंदे यांनी काय मागणी केली?

    Ans: SIR प्रक्रियेवर आक्षेप घेत त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचं आव्हान दिलं.

  • Que: प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेबाबत काय आरोप केले?

    Ans: महालॅब आणि डायलिसिस सेंटर १ नोव्हेंबरपासून बंद झाल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी आरोग्य सुविधांसाठी निधी आणि थकीत देण्यांचा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

  • Que: प्रणिती शिंदे यांनी सोलापुरातील AI डेटा सेंटर प्रकल्पाला विरोध का केला?

    Ans: या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागण्याची शक्यता असून सोलापूरच्या आधीच गंभीर असलेल्या पाणीप्रश्नावर त्याचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली. उजनी परिसरातील जैवविविधतेवरही परिणाम होण्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: Praniti shinde on bjp protest press conference vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • praniti shinde
  • Solapur News

संबंधित बातम्या

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
1

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त
2

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
3

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

Solapur News : सोलापूरमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी १० कोटींचे निवारा केंद्र! १ हजार कुत्र्यांना मिळणार आसरा
4

Solapur News : सोलापूरमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी १० कोटींचे निवारा केंद्र! १ हजार कुत्र्यांना मिळणार आसरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.