Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Karjat Saidongar Deforestation : कर्जतच्या सायडोंगर येथील वृक्षतोडीवरून राज्यातील राजकारण तापलं असताना प्रकाश आंबेडकर यांनी टोरंट ग्रुपच्या इलेक्टोरल बाँड्समधील देणग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 03, 2026 | 10:11 PM
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar

Follow Us
Follow Us:
  • कर्जतच्या सायडोंगर प्रकल्पावरून प्रकाश आंबेडकरांचा मोठा खुलासा
  • टोरंट पॉवरकडून भाजप, काँग्रेसला कोट्यवधींचा निधी
  • राष्ट्रवादी, शिवसेना आणि आम आदमी पार्टीचाही उल्लेख
 

Karjat Saidongar Deforestation : कर्जत मधील सायडोंगर येथे झालेल्या वृक्षतोडीनंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्जतमधील नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि राजकीय पक्ष नेत्यांनी यावर कडाऊन टीका करत प्रकल्पाला विरोध केला आहे. अश्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकल्पावरून धक्कादायक खुलासा केला असून त्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवरदेखील निशाणा साधला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत कर्जत मधील सायडोंगर येथे होत असलेल्या टोरंट प्रकल्पावर भाष्य केले. यावेळी त्यांनी धक्कादायक खुलासा करत टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आम आदमी पार्टी यांनीही राजकीय पक्ष निधी घेतला असल्याचं म्हंटल आहे.

नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी टोरंट पॉवरने इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांना निधी दिल्याची माहिती मांडली. त्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, भाजपला ७६ कोटी रुपये, काँग्रेसला १७ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला ३.५ कोटी, शिवसेनेला ३ कोटी आणि आम आदमी पार्टीला ७ कोटी रुपये मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

टोरंट फार्मास्युटिकल्सकडूनही राजकीय पक्षांना निधी

याशिवाय टोरंट फार्मास्युटिकल्सकडूनही विविध राजकीय पक्षांना इलेक्टोरल बाँड्सद्वारे निधी मिळाल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या माहितीनुसार, या कंपनीकडून भाजपला ६१ कोटी, काँग्रेसला ५ कोटी, आम आदमी पार्टीला १ कोटी, समाजवादी पक्षाला ३ कोटी आणि सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला ७ कोटी रुपये देण्यात आले. सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटलाही ५० लाख रुपये मिळाल्याचा त्यांनी उल्लेख केला. या दोन्ही कंपन्यांच्या देणग्यांचा संदर्भ देत भाजपला एकूण १३७ कोटी आणि काँग्रेसला २२ कोटी रुपये मिळाल्याचं त्यांनी म्हटलं.

प्रकाश आंबेडकरांचा राजकीय पक्षांना थेट सवाल!

या देणग्यांचा मुद्दा उपस्थित करत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, टोरंट ग्रुपकडून निधी घेतलेल्या राजकीय पक्षांचे नेते आता कर्जतमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उभे राहत आहेत. मग या पक्षांनी टोरंट ग्रुपसोबत राहायचं की सह्याद्रीच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या नागरिकांसोबत, हे स्पष्ट करावं.

टोरंट पॉवरने ईलेक्ट्रोल बॉण्ड घेऊन खालील राजकीय पक्षांना पक्ष निधी दिलाय. 👇 • भाजप – 76 कोटी रुपये
• भारतीय काँग्रेस पार्टी – 17 कोटी रुपये
• राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – 3.5 कोटी रुपये
• शिवसेना – 3 कोटी रुपये
• आम आदमी पार्टी – 7 कोटी रुपये
टोरंट पॉवरचा एक प्रोजेक्ट टोरंटो फार्मसिटीक्युल डोनेशन नावाने आसामच्या सिलिगुडीमध्ये आहे. या कंपनीने सुद्धा ईलेक्ट्रोल बॉण्ड विकत घेऊन भाजपला 61 कोटी रुपये दिले. • सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा – 7 कोटी रुपये
• काँग्रेस 5 कोटी रुपये
• समाजवादी पक्ष 3 कोटी रुपये
• आम आदमी पक्ष 1 कोटी रुपये
• सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट 50 लाख रुपये.
आतापर्यंत भाजप – 137 कोटी रुपये आणि
काँग्रेस पक्षाला 22 कोटी रुपये मिळाले आहेत.
हे सर्व डोनेशन 2022-24 साली देण्यात आले आहेत. टोरंट कंपनीचा आयपीएलशी संबंध आहे. अमित शाहच्या मुलाशीही याचा संबंध आहे. ज्यांनी टोरंटकडून निधी घेतला ते सर्व राजकीय पक्ष, त्यांचे नेते हे रायगडच्या कर्जतमध्ये शेतकऱ्यांना भेटले, त्यांनी सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. माझा त्यांना सवाल आहे, हे राजकीय डोनेशन घेतल्यानंतर हे राजकीय पक्ष टोरंट ग्रुपसोबत उभे राहणार की सह्याद्री बचावासाठी लढणाऱ्या लोकांसोबत उभे राहणार? याचा खुलासा या पक्षांनी
करावा!
#टोरंट #कर्जत — Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) November 3, 2026

दरम्यान, सायडोंगर प्रकल्पासाठी ३२,४९० झाडे तोडण्याच्या प्रस्तावामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी आहे. ३,००० मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पावरून पर्यावरण आणि विकासाचा मुद्दा चर्चेत आला आहे. वृक्षतोडीला विरोध वाढल्यानंतर ही प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आल्याचंही वृत्त आहे.

आता प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या इलेक्टोरल बाँड्सच्या मुद्द्यावर संबंधित राजकीय पक्ष काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागलं आहे.

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज

💡

Frequently Asked Questions

  • Que: टोरंट पॉवरकडून कोणत्या राजकीय पक्षांना निधी मिळाल्याचा उल्लेख आहे?

    Ans: प्रकाश आंबेडकर यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आम आदमी पार्टीला निधी मिळाल्याची आकडेवारी सांगितली.

  • Que: कर्जतच्या सायडोंगर प्रकल्पाला विरोध का होत आहे?

    Ans: या ३,००० मेगावॅट क्षमतेच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जंगल जमीन वळती करण्याचा आणि ३२,४९० झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी जैवविविधता आणि जंगलाच्या संरक्षणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

  • Que: प्रकाश आंबेडकर यांनी टोरंट कंपनीबाबत काय खुलासा केला?

    Ans: टोरंट पॉवर आणि टोरंट फार्मास्युटिकल्सकडून इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून विविध राजकीय पक्षांना निधी मिळाल्याचा मुद्दा त्यांनी पत्रकार परिषदेत मांडला.

Web Title: Karjat saidongar deforestation prakash ambedkar torrent power electoral bonds vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 10:07 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • karjat news
  • Prakash Ambedkar
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज
1

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
2

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त
3

Congress Review Committee : विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या! बाळासाहेब थोरातांसह चौघांची समिती नियुक्त

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
4

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.