
कर्नाटक हायकोर्टाने दिली निर्णयाला स्थगिती
संघाच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर घातली होती बंदी
सिद्धरामय्या सरकारला दणका
Karnataka Government: कर्नाटक सरकारला हयकोर्टाने मोठा दणका दिला आहे. कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. हायकोर्टाच्या धारवाड खंडपीठाने कर्नाटक सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सरकारला मोठा धक्का बसला आहे.
कर्नाटक सरकारने सरकारी ठिकाणी कोणतीही कृती करण्याआधी खाजगी संस्थांना सरकारची परवानगी घेणे अनिवार्य केले होते. हा निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सार्वजनिक कार्यकमांवर बंदी घालण्यासाठी घेण्यात आला होता. संघवार बंदी घालण्याची मागणी मंत्री प्रियंक खरगे यांनी पत्र लिहीत केली होती. मात्र आता धारवाड खंडपीठाने सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
कर्नाटक सरकारने सरकारी ठिकाणी कोणतीही कृती करण्याआधी खाजगी संस्थांना सरकारची परवानगी घेणे अनिवार्य केले होते. हा निर्णय संघाच्या कार्यक्रमांवर बंदी आणण्यासाठीच घेतला होता. या निर्णयाने संघाच्या संचलनावर आणि अन्य कार्यक्रमांवर परिणाम होणार होता. मात्र आता हायकोर्टाने या निर्णीला स्थगिती दिली आहे.
नेमका विषय काय?
कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी कर्नाटक सरकारला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानविरोधी काम करत असल्याचा आरोप केला आहे. संघ युवकांना भडकवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कर्नाटकमध्ये कॉँग्रेसचे सरकार आहे. दरम्यान प्रियंक खरगे यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हे संपूर्ण प्रकरण समजावून घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचा आढावा घेऊन त्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपने मात्र प्रियंक खरगे यांच्या या मागणीचा जोरदार विरोध केला आहे.
प्रियंक खरगे यांनी आपल्या पत्रात, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर पूर्णपणे बंदी आणली जावी. शाखा आणि बैठका यावर बंदी घालावी. सार्वजनिक कार्यक्रम, खेळाची मैदाने, शाळा या ठिकाणी शाखा लावण्यास बंदी घालावी. संघ संविधान विरोधी काम करत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या पत्रात केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पार केली शंभरी; परंपरा…संघटना..समाजकार्यामध्ये ठरली एक नंबरी
भाजपचे प्रत्युत्तर
कॉँग्रेस पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री डिके शिवकुमार यांनी देखील संघाची प्रार्थना म्हणत याचे कौतुक केले होते. संघाची वाढणारी लोकप्रियता कॉँग्रेसच्या पचनी पडत नाहीये. मात्र संघाची स्वतःची अशी भूमिका आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या रक्षणासाठी कायमच पुढे राहील.