Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karnataka Landslide: क्षणात होत्याचं नव्हतं! कर्नाटकातील भूस्खलनात चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Karnataka Landslide: कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात कामगारांची झोपडी मातीखाली दबली गेली. या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 02, 2026 | 01:10 PM
Karnataka Landslide: क्षणात होत्याचं नव्हतं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Karnataka Landslide: क्षणात होत्याचं नव्हतं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • शिवमोग्गा जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर भीषण भूस्खलन.
  • एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; ३ वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश.
  • कामगारांची झोपडी मातीखाली दबल्याने ही दुर्दैवी दुर्घटना घडली.
Karnataka Shivmogga Landslide: कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यात रविवारी पहाटे घडलेल्या एका भीषण दुर्घटनेने परिसर हादरून गेला. मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग अचानक खचला आणि त्याखाली कामगारांची झोपडी दबली गेली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्याचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ही घटना किती घडली?

ही घटना तीर्थहळ्ळी तालुक्यातील इंदिरा नगर भागात पहाटे साडेदोनच्या सुमारास घडली. त्या वेळी बहुतांश लोक गाढ झोपेत होते. अचानक मोठा आवाज झाला आणि डोंगराच्या उतारावरील माती व दगड झोपडीवर कोसळले. काही क्षणांत संपूर्ण झोपडी ढिगाऱ्याखाली गेली.

ढिगारा हटवण्याचे काम सुरू

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. अंधार आणि सुरू असलेल्या पावसातही त्यांनी बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. काही वेळातच बचाव पथके घटनास्थळी पोहोचली आणि ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले. (Karnataka Landslide:)

तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले

बचावकार्यादरम्यान तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतांमध्ये 35 वर्षीय मल्लिकार्जुन, 28 वर्षीय नागवेण आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा संतोष यांचा समावेश आहे. हे कुटुंब मूळचे कोप्पल जिल्ह्यातील गंगावती तालुक्यातील कोक्करेगारू गावचे होते. रोजगाराच्या शोधात ते शिवमोग्गा येथे आले होते आणि गेली दोन वर्षे त्या भागात वास्तव्यास होते.

या दुर्घटनेत जवळच्या झोपडीत राहणारा आणखी एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली.

जोरदार पावसामुळे डोंगराची माती सैल

अधिकाऱ्यांच्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंगराची माती सैल झाली होती. त्यातूनच पहाटे अचानक भूस्खलन झाले. मलनाड भागात यंदा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने अशा घटनांचा धोका वाढला आहे.

अनेक अडचणींचा सामना

सतत पडणाऱ्या पावसामुळे बचाव पथकांना काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चिखल, घसरडा परिसर आणि पावसामुळे यंत्रसामग्री वापरणेही कठीण झाले होते. तरीही अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले.

महानदीचा रौद्रावतार; ओडिशातील २० जिल्हे पुराच्या विळख्यात, हजारो गावे जलमय तर १.८९ लाख नागरिक सुरक्षितस्थळी

घटनेनंतर पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. भूस्खलन नेमके कोणत्या कारणामुळे झाले आणि परिसरातील इतर ठिकाणीही धोका आहे का, याची पाहणी केली जात आहे. स्थानिक प्रशासनानेही संवेदनशील भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याची

दरम्यान, शिवमोग्गा आणि आसपासच्या अनेक भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही रस्त्यांवर वाहतूकही प्रभावित झाली असून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि डोंगराळ किंवा भूस्खलनाचा धोका असलेल्या भागात जाणे टाळावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

दिलासादायक ! ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात कपात; थेट 200 रुपयांनी झाला स्वस्त

या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पावसाळ्यात डोंगराळ भागातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेषतः अशा भागात राहणाऱ्या मजूर कुटुंबांसाठी सुरक्षित निवासाची गरज अधोरेखित झाली आहे. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची ही घटना अनेकांना अस्वस्थ करून गेली आहे.

Web Title: Karnataka shivmogga landslide three dead including a three year old child ntc acwi dskc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Karnataka
  • Landslide
  • latest news

संबंधित बातम्या

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले
1

Movie Tickets To Get Cheaper : ‘या’ राज्यात स्वस्त होणार चित्रपटांची तिकिटे! हायकोर्टाच्या एका निर्णयामुळे दर थेट घसरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.