Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Assam Bus Accident: आसाममध्ये काळाचा घाला! भरधाव मिनी बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Assam Bus Accident: आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ मिनी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. गोलाघाट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ७१५ वर रंगाजन परिसरात झालेल्या या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2026 | 06:30 PM
आसाममध्ये काळाचा घाला! भरधाव मिनी बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

आसाममध्ये काळाचा घाला! भरधाव मिनी बस कंटेनर ट्रकवर आदळली; २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Follow Us
Follow Us:
  • काझीरंगाजवळ भीषण अपघात!
  • मिनी बस आणि कंटेनर ट्रकची समोरासमोर धडक
  • २३ जणांचा मृत्यू
Assam Bus Accident: आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ शुक्रवारी भीषण रस्ते अपघाताची घटना समोर आली. या प्रवासी मिनी बस आणि कंटेनर ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलीस आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले.(Assam Bus Accident)

राष्ट्रीय महामार्ग ७१५ वर भीषण दुर्घटना

गोलाघाट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ७१५ वर कोहोरा रेंजअंतर्गत हातीकुली टी इस्टेटजवळील रंगाजन परिसरात हा अपघात झाला. प्रवासी मिनी बसची समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.

Sheikh Hasina : चीनसोबतच्या लढाऊ विमान करारावर शेख हसीनांचे प्रश्नचिन्ह; म्हणाल्या, आर्थिक क्षमता तपासा

गोलाघाटचे जिल्हाधिकारी बिस्वजीत फुकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी सुरुवातीच्या माहितीनुसार २३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. बचाव पथकाकडून बसमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू होते. बसमध्ये एकूण किती प्रवासी होते, याची माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकली नव्हती.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्याकडून शोक व्यक्त

या भीषण दुर्घटनेबद्दल आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचे त्यांनी म्हटले. मृतांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या असून, या कठीण प्रसंगी संपूर्ण आसाम त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.जखमींना कोणताही विलंब न करता सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जखमी लवकर बरे व्हावेत आणि मृतांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळावे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.

मंत्री अतुल बोरा घटनास्थळी दाखल

अपघाताची माहिती मिळताच आसामचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री तसेच स्थानिक आमदार अतुल बोरा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतला. जखमींना कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात पाठवण्यात आले.

भरधाव वेगामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज

गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांच्या माहितीनुसार, मिनी बस वेगाने जात होती. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात लागू असलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरधाव वेगामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या कंटेनर ट्रकला धडकली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मध्य प्रदेशातील सागरमध्येही भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

दरम्यान, मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४४ वर देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपालपुरा परिसरात ट्रक आणि एसयूव्हीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एसयूव्हीमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व प्रवासी भैंसा गावातील रहिवासी होते. अमावस्येनिमित्त नर्मदा स्नानासाठी ते बर्मन येथे जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की एसयूव्हीचा चक्काचूर झाला. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी गाडी कापावी लागली.

Kulgam Terror Attack : कुलगाम पुन्हा हादरलं, दिवाळीच्या तोंडावर दहशतवाद्यांचा जवानांवर गोळीबार; तिघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

💡

Frequently Asked Questions

  • Que: आसाममधील काझीरंगाजवळ झालेल्या अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: प्राथमिक माहितीनुसार, मिनी बस आणि कंटेनर ट्रकच्या धडकेत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

  • Que: हा अपघात नेमका कुठे झाला?

    Ans: आसाममधील गोलाघाट जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ७१५ वरील कोहोरा रेंजअंतर्गत हातीकुली टी इस्टेटजवळील रंगाजन परिसरात हा अपघात झाला.

  • Que: जखमींना कुठे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे?

    Ans: जखमींना कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Web Title: Kaziranga assam bus container truck collision 23 killed many injured sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Assam
  • bus
  • Road Accident

संबंधित बातम्या

Asaduddin Owaisi :  महाराष्ट्रात UCC नव्हे, हिंदू सिव्हिल कोड लागू करण्याचा डाव; ओवैसींचा फडणवीस सरकारवर आरोप
1

Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात UCC नव्हे, हिंदू सिव्हिल कोड लागू करण्याचा डाव; ओवैसींचा फडणवीस सरकारवर आरोप

अपघाती मृत्यू रोखण्यात गडचिरोली ‘टॉप’ला; नागपूरचीही उल्लेखनीय कामगिरी
2

अपघाती मृत्यू रोखण्यात गडचिरोली ‘टॉप’ला; नागपूरचीही उल्लेखनीय कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.