Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahakumbh fire case : कुंभमेळ्यामध्ये आग लागली नाही तर लावली…; ‘या’ खालिस्तानी संघटनेने घेतली जबाबदारी

उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये आगीची घटना घडली आहे. ही आग गॅस सिलेंडर फुटल्यामुळे लागल्याची घटना घडली होती. मात्र आता ही आग लागली नाही तर लावली गेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 22, 2025 | 11:05 AM
Khalistan Zindabad Force claims responsibility for setting fire to Prayagraj Mahakumbh Mela

Khalistan Zindabad Force claims responsibility for setting fire to Prayagraj Mahakumbh Mela

Follow Us
Follow Us:

प्रयागराज : उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह आहे. 144 वर्षांनंतर होणाऱ्या या महाकुंभमेळ्यासाठी नागा साधूंसह मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे. कोट्यवधी लोकांनी अमृतस्नान केले आहे. मात्र प्रयागराजमध्ये आगीची घटना देखील घडली आहे. रविवारी (दि.19) या आगीमध्ये मोठे नुकसान झाले. मात्र ही आग लागली गेली नव्हती तर लावली गेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. खालिस्तानी संघटनेने याची जबाबदारी घेतली आहे.

रविवारी प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्यात सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. विवेकानंद सेवा समिती वाराणसीच्या टेंटमध्ये जेवण बनवताना ही आग लागली. आग कशी लागली, त्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ही आग वेगाने पसरली. त्यामुळे आसपासचे तंबू यामध्ये जळून खाक झाले. या टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडरचे ब्लास्ट झाले. जवळपास 20 ते 25 तंबू या आगीत जळाले. ही आग गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली होती. मात्र आता हा हल्ला खालिस्तानी संघटनेने घेतली आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिक करा

मीडिया रिपोर्टनुसार, कुंभमेळ्यामध्ये लागलेली आगीच्या घटनेची खालिस्तान जिंदाबाद फोर्स (KZF) या दहशतवादी संघटनेने जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ई-मेल पाठवला आहे, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे म्हटले आहे. हा स्फोट म्हणजे सीएम योगींना दिलेला इशाराच आहे. ही सुरुवात आहे, असं म्हटलं आहे. यामुळे कुंभमेळ्यावर खालिस्तानी संस्थेच्या हल्ल्याचे सावट असल्याचे दिसून येत आहे.

नेमकं झालं काय?

प्रयागराजमधील कुंभमेळ्यामधील सेक्टर 19-20 मध्ये आग लागली होती. जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल होत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलीस आणि एनडीआरएफच्या टीम्सनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आसपासचे हिस्से रिकामे केले. शास्त्री पुल आणि रेल्वे पुल दरम्यान ही आग लागली होती. हा पूर्ण भाग महाकुंभ क्षेत्रामध्ये येतो. टेंटमध्ये ठेवलेल्या सिलेंडर्सचे एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले, त्यामुळे आगीने विक्राळ रुप धारण केलं. सिलेंडर ब्लास्टमुळे आग वेगाने पसरली. आगीच्या या घटनेमुळे संपूर्ण क्षेत्रात एकच घबराट, गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर

योगी आदित्यनाथ यांनी दिली भेट

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील घटनास्थळी भेट देत महाकुंभमेळा परिसरात दाखल झाले. दरम्यान, परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्रीही त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. मेळा आणि पोलिस प्रशासनाव्यतिरिक्त, त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडूनही घटनेची माहिती गोळा केली. तसेच तातडीने मदतकार्य करण्याचे निर्देश दिले. परिसरात आग आणि आपत्ती टाळण्यासाठी सर्वतोपरी व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले. जेणेकरून सुरक्षित महाकुंभात भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यावेळी डीआयजी वैभव कृष्णा, फेअर ऑफिसर विजय किरण, एसएसपी राजेश द्विवेदी, अग्निशमन उपसंचालक अमन शर्मा, ओएसडी आकांक्षा राणा आदी उपस्थित होते.

 

Web Title: Khalistan zindabad force claims responsibility for setting fire to prayagraj mahakumbh mela

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • Mahakumbh Mela
  • Prayagraj
  • Yogi adityanath

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.