Rahul Gandhi praised PM Narendra Modi
नवी दिल्ली : सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये अनेकदा वाद विवाद आणि खडाजंगी होत असते. सभागृहाबाहेर देखील पक्षीय सभांमध्ये राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. दरम्यान, राहुल गांधींनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. मोदींच्या एका निर्णयावरुन राहुल गांधींनी हे कौतुक केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चांना उधाण आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वायनाडचा दौरा करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंदर मोदी हे केरळच्या वायनाड जिल्ह्याला भेट देणार आहे. वायनाडमध्ये भूस्खलन झाल्यामुळे मोठी जीवितहानी झाली होती. याठिकाणी पंतप्रधान मोदी भेट देऊन मदत आणि पुनर्वसन याबाबत आढावा घेणार आहेत. या संकटातून वाचलेल्यांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार असून त्यांच्या पुर्नवसनासाठी प्रयत्न करणार आहेत. मोदी सकाळी 11 च्या सुमारास कन्नूरला पोहोचतील आणि त्यानंतर वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागांचे हवाई सर्वेक्षण करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. वायनाडमध्ये नरेंद्र मोदी दौरा करणार असल्यामुळे राहुल गांधींनी कौतुक केले आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी राहुल गांधींनी धन्यवाद मानले. ते म्हणाले, मोदीजी, वायनाडला भेट देऊन या भीषण दुर्घटनेचा वैयक्तिक आढावा घेतल्याबद्दल धन्यवाद. हा एक चांगला निर्णय आहे. मला विश्वास आहे की एकदा पंतप्रधानांनी विध्वंसाची व्याप्ती स्वतःच पाहिली की ते ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करतील, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.
Thank you, Modi ji, for visiting Wayanad to personally take stock of the terrible tragedy. This is a good decision.
I am confident that once the Prime Minister sees the extent of the devastation firsthand, he will declare it a national disaster.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 9, 2024
वायनाडमध्ये प्रचंड भूस्खलन
केरळमधील वायनाडमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनामुळे प्रचंड हाहाकार माजला आहे. आत्तापर्यंत मृतांची संख्या 413 वर पोहोचली आहे. तर 152 लोकांचा अद्याप शोध सुरु आहे. तसेच केवळ 150 जणांचे शरीराचे अवयव सापडले आहेत. शोध मोहिमेचा आज (10 ऑगस्ट) 13 वा दिवस आहे. हा अति दुर्गम भाग असून बचावकार्य सुरु आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने शोध मोहीम राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडमध्ये दौरा करणार असल्यामुळे मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.