Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता शेतकऱ्यांना सरकारने मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून आज राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2025 | 12:05 PM
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे अतिवृष्टी आणि वादळामुळे मराठवाड्यासह विविध भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला असून बळीराजावर संकट कोसळलं आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत. यावरुन आता शेतकऱ्यांना सरकारने मदत देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाकडून आज राज्यभर तीव्र आंदोलन केले जात आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असतानाही भाजपा महायुतीचे सरकार फक्त घोषणाबाजी करत असून शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्ज माफ करावे, वीज बिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी, अशा मागण्या काँग्रेसने आंदोलनादरम्यान केल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. यावेळी खासदार डॉ कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, माजी आमदार नामदेवराव पवार, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रपूरच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी वरोरा येथे भव्य चक्काजाम आंदोलन केले. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनाला हजारो शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली.

तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्याची आणि कापूस उत्पादकांना प्रति हेक्टर १ लाख रुपयांची तर सोयाबीन उत्पादकांना प्रति हेक्टर २.५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची ठाम भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली. यावेळी चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश तिवारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, जालना, लातूर, वर्धा, रत्नागिरी सह राज्यातील इतर जिल्ह्यात व तालुकास्तरावरही आंदोलन करून भाजपा महायुती सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या व प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

हे सुद्धा वाचा : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

Web Title: Congress party is staging a strong protest today over farmers issues

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Farmers

संबंधित बातम्या

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
1

अवकाळी पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल; दिलीप वळसे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी
2

खेडच्या पश्चिम पट्ट्यात अवकाळीचा हाहाकार, चिखलगाव परिसरात पिके जमीनदोस्त; शेतकऱ्यांकडून तातडीने पंचनाम्यांची मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन
3

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट; ‘या’ मागण्यांचे दिले निवेदन

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप
4

दहा दिवसांत आम्हाला घराचा ताबा मिळावा, नाहीतर आम्ही…; पुण्यात बिल्डरविरोधात सदनिकाधारकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.