British PM Keir Starmer to visit India in next week
Britain PM Keir Starmer to Visit India : लंडन/नवी दिल्ली : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmar) पुढील आठवड्यात भारतात येणार आहेत. ८ ते १० ऑक्टोबर त्यांचा दौरा असणार आहे. यावेळी ते भारताची आर्थिक राजधानी मुंबईत प्रवास करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट धेणार आहे. दोन्ही नेते ग्लोबल फिनटेक फेस्ट (GFF) २०२५ परिषदेत सहभागी होणार आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण या दौऱ्यात दोन्ही देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधाना नवी दिशा मिळणार आहे.
यावेळी भारत आणि ब्रिटनमध्ये २०२४ मध्ये झालेल्या टेक्नॉलॉजी सिक्युरिटी इनिशिएटिव्ह (TSI) वर चर्चा होणार आहे. या अंतर्गत दोन्ही देशात तंत्रज्ञान, नवोपक्रम सरुक्षित करण्यावर, सायबर सुरक्षा आणिAI प्रशासन यांसारख्या जागतिक आव्हानांनावर सविस्तर चर्चा होईल. तसेच या दौऱ्यापूर्वी भारत आणि ब्रिटनमध्ये संगणकीय क्षेत्रात महत्त्वाचा करार झाला आहे. यावरही त्यांच्या या दौऱ्यादरम्यान चर्चा होईल.
Japan News : जपानला मिळणार नवे नेतृत्त्व! साने ताकाइची बनणार पहिल्या महिला पंतप्रधान
हा करार क्वांटम कप्यूटिंगशी संबंधित आहे. या द्वारे जैव तंत्रज्ञानाचा हवामान बदला नुसार शेतात उयुक्त लागवडीसाठी उपयोग करुन घेण्यात येणार आहे. यामुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. हा करार इंपीरियल कॉलेज लंडन आणि
भारतीय तंत्रज्ञा संस्था (IIT) बॉम्बे यांच्यात झाला आहे. हा प्रकल्प देखील भारत-यूके टेक्नॉलॉजी सिक्युरिटी इनिशिएटिवचा (TSI) चा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
या प्रकल्पाचा उद्देश जमिनीतील सूक्ष्मजीवांचा अभ्यास करुन दुष्काळ आणि हवामान बदलामुळे प्रभावित होणाऱ्या पिकांचे संरक्षण करण्याचा नवा मार्ग शोधणे आहे. हा प्रकल्प जागतिक अन्न सुरक्षा आणि हवामानाशी संबंधित तातडीच्या समस्यांवर क्वांटम तंत्रज्ञानाद्वारे उपाय शोधण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. गेल्या वर्षी भारत आणि ब्रिटनमध्ये TSI अंतर्गत यावर स्वाक्षरी झाली होती. या TSI ची परिषदेत ऑक्टोबरमध्ये मुंबईत होणार आहे. ही नवी भागीदारी भारत आणि ब्रिटनच्या संबंधानां अधिक उंचीवर नेण्यास सक्षम आहे.
प्रश्न १. ब्रिटनचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर कधी येणार आहेत?
ब्रिटनचे पंतप्रधान पुढील आठवड्यात ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत.
प्रश्न २. ब्रिटन आणि भारतामध्ये कोणता महत्त्वपूर्ण करार झाला आहे?
भारत आणि ब्रिटनमध्ये क्वांटम कप्यूटिंगशी संबंधित क्षेत्रात महत्त्वाचा करार झाला आहे.
प्रश्न ३. काय आहे भारत आणि ब्रिटनमधील क्वांटम कप्यूटिंग करार?
भारत आणि ब्रिटनमध्ये क्वांटम कंप्यूटिंग करार झाला आहे, ज्याअंतर्गत जैव तंत्रज्ञानाचा हवामान बदला नुसार शेतात उयुक्त लागवडीसाठी उपयोग करुन घेण्यात येणार आहे. यामुळे भारतीय शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.